नांदगावला वेडसर व्यक्ती रेल्वेवर चढला, पण प्रसंगाव….
नांदगावला वेडसर व्यक्ती रेल्वेवर चढला, पण प्रसंगाव....

वेगवान नासिक / Wegwan NASHIK
नांदगाव, दिनांक 4 सप्टेंबर 2024, बुधवार
नांदगाव तालुका प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :- नांदगाव रेल्वे स्टेशनवर दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी बुधवारी उभ्या असलेल्या रेल्वे गाडी क्रमांक 22538 कुशीनगर एक्सप्रेस या प्रवासी रेल्वे गाडीच्या डब्यावर पहाटेच्या सुमारास वेडसर असलेला व्यक्ती चढला व इकडे तिकडे चालू लागला या गाडीवरून त्याने नांदगाव रेल्वे स्थानकात उभी असलेल्या महानगरी एक्सप्रेस रेल्वे गाडीवरही उडी मारली.
ओव्हर हेड वायर अगदी जवळच होती. त्याचा थोडासा या वायरला लागला असता तर त्याचा विद्युत करंट लागून फटाकडा झाला असता. मात्र रेल्वेच्या इलेक्ट्रिक विभागाचे प्रमुख संदीप पाटील यांनी प्रसंगावधान राखत ओव्हर हेड वायर मधील विद्युत पुरवठा खंडित केला त्यामुळे त्या वेडसर व्यक्तीचा जीव वाचला
यावेळी नांदगाव रेल्वे स्थानकावर उपस्थित असलेले रेल्वे पोलिसांनी त्याला रेल्वेच्या डब्यावरून खाली खेचले या सर्व प्रकारामुळे दोन्ही रेल्वे गाड्यांना मात्र अर्ध्या तासाचे फरकाने नांदगाव रेल्वे स्थानकाबाहेर पडावी लागले. या वेडसर माथेफिरूला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
