प्रदुषण नियंत्रण मंडळ व साखर कारखान्यांवर गुन्हा दाखल करा नाहीतर.. ” दिला उपोषणाचा इशारा ” पहा…या कारखान्याने केला ह्वा गावावर अन्याय ..
प्रदुषण नियंत्रण मंडळाने दाखवली केराची टोपली.. उपोषणाला बसणार च .. न्याय मिळेपर्यंत !
वेगवान नाशिक / भाऊसाहेब र हांडोरे
- सिन्नर दि .३ सप्टेंबर २०२४ _ दि. ४ सप्टेंबर २९२४ — आम्ही कोणालाही घाबरत नाही. आमचा बाप आहे ना.. उपमुख्यमंत्री … ! आतापर्यंत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत पण आम्हाला कारखाना चालवायचा आहे . त्यामुळे या छोट्या गोष्टींकडे आम्ही लक्ष देत नाही ” पंधरा ते वीस वर्ष्चायापासुन मळी पाण्याने मळी सुद्धा शेतकऱ्यांची परणवाणगी न घेता जबरदस्तीने गळ्यात घातली जात आहे आता कंपोस्ट खत तयार करण्याच्या नावाखाली ग्रामस्थाचं आरोग्य धोक्यात आले आहे.. प्रदुषण नियंत्रण अधिकारी यांनी देखील केराची टोपली दाखवल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.त्यांच्यावर प्रथम कार्यवाही होणें अपेक्षित आहे. परंतु आर्थिक देवाणघेवाण झाली असून त्यांच्यावरच कुठल्याही कार्यवाही होणारच नाही..हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही हां निर्णय घेत असल्याचे बाबा मोकळ यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची नियमबाह्य कोपरगाव सहकारी साखर कारखाना लि गौतम नगर (कर्मवीर शंकरराव काळे सहसा कारखाना) ता कोपरगाव जी अहमदनगर यांची ग्रामपंचायत कोळगाव माळी यांची परवानगी न घेता कंपोस्ट प्लॅन टाकण्यासाठी शासनाच्या अटी/शेतीचे पालन करता साखर कारखाना यांनी राजकीय दबाव टाकून प्रदूषण विभागाकडून परवानगी घेऊन 2005 मध्ये कोळगाव माळ येथे नियमबाह्य प्लांट चालू केला . याबाबत मी स्वतः या ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच होतो माझ्याकडून सदर प्लांट चालू करण्यासाठी मी कारखान्याच्या परवानगी दिली नाही प्लांट चालू झाल्यापासून ते आजपर्यंत मी स्वतःच्या प्रकरणात फार पुरवठा करीत आलो आहे तरी मला प्रदूषण मंडळाच्या अधिकारी/कर्मचारी यांच्या कोणते शासकीय नियमाप्रमाणे सहकार्य केले नाही त्यांच्या त्यांनी त्यांच्या शासन ठरवून दिलेल्या कायद्याप्रमाणे काम केले नाही त्यामुळे मला आता सर्वांच्या विरोधात बेमुदत आमरण उपोषण करण्यास भाग पाडणाऱ्या प्रदेशामंडळी अधिकारी/कर्मचारी व साखर कारखान्याचे विद्यमान संचालक मंडळ वरती फौजदारी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत माझ्याबरोबर उपोषण चालूच राहील.. अशा आशयाचे पत्र त्यांनी प्रसिद्ध केले आहे…
धनदांडग्या पुढाकार्याच्या दबावामुळे प्रदुषण नियंत्रण मंडळाने दिला एवढा बोगस निर्णय.. की आम्हाला वेळ नाही आहे ते योग्य असल्याचे उत्तर..त्यामुळे उपोषणाला बसणार च …आता मात्र माघार नाही…. बाबा मोकळ (सामाजिक कार्यकर्ते )