वेगवान नाशिक / Wegwan NASHIK
नांदगाव, दिनांक 3 सप्टेंबर 2024 मंगळवार
नांदगाव तालुका प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :- दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी मंगळवारी विविध प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील बस कामगारांनी राज्यात बेमुद्रा बेमुदत आंदोलन पुकारले. या आंदोलनात नांदगाव एसटी बस आगारातील कर्मचारी 100% काम बंद आंदोलनात उतरले आहेत. या काम बंद आंदोलनामुळे प्रवाशांना हाल सोसावे लागत आहे.
शासनाने लेखी आश्वासन दिले. परंतु शासनाने पाळले नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील एसटी बस कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारले असून या काम बंद आंदोलनामध्ये नांदगाव एसटी बस आगारातील 300 कामगार काम बंद आंदोलनात सामील झाले आहेत. नांदगाव एसटी बस आगारातील बस कामगारांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनात येथील सर्व एसटी संघटना एकवटल्या आहेत.
नांदगाव एसटी बस आग्रहातील 19 चालक व 86 वाहक आणि इतर असे एकूण 300 कर्मचारी संपावर उतरले आहेत. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. नांदगाव एसटी डेपोतील 52 बसेस एसटी डेपोत थांबून आहेत. एकूण 13 प्रमुख मागण्या बस कामगारांनी केल्या आहेत.
हे काम बंद आंदोलन 3 सप्टेंबर 2024 मंगळवारपासून सुरू झाले आहे. नांदगाव एसटी डेपोतील कामगारांसाठी योजना देत आहे त्या पूर्ववत चालू ठेवाव्यात. या काम बंद आंदोलनामुळे नांदगाव आग्रातील कामगार संपावर गेल्याने प्रवाशांची अत्यंत दुर्लक्षा होत आहे.
मुक्ताराम बागुल हे वेगवान नाशिकचे नांदगाव तालुक्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते पत्रकार म्हणून सक्रिय आहे.