बैल पोळा सणाला लाडकी बहिण योजनेचा जलवा…
आमदार कन्या जि.प.सदस्या सिमिंतिनी कोकाटे यांनी बैलं धरून केला पोळा सण साजरा !
वेगवान नाशिक / भाऊसाहेब र हांडोरे
सिन्नर : दि.३ सप्टेंबर २०२४ पावसाने ओढ दिलेल्या पावसाने पोळा सणाला दिवशी दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी वर्गासह तालुक्यातील जनतेला समाधान व्यक्त केले जात आहे. पावसाचा आनंद साजरा करतांना बैलं सजावट करण्यासाठी शेतकर्यामध्ये लाडकी बहिण योजनेचा जलवा पाहायला मिळाला.. बहुतेक शेतकर्यांनी आपल्या लाडक्या बैलांना ” लाडकी बहिण योजनेची झालर चडवून बैल पोळा सण साजरा करतांना दिसुन येते होता.
” लाडकी बहिण योजनेला एक महिन्याची मुदत वाढविण्यात आली असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. आता या पुढे या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदत वाढली व अर्ज दाखल करणार्या महिला या पुढे रूपये तब्बल साडेचार हजार रुपये जमा आहे.. “
लाडकी बहिण योजनेची अनेक शेतकरी कुटुंबातील महिलांना तिन हजार रुपये मिळाल्याने व ऐन पोळ्याच्या दिवशी पावसाने सकाळ पासून धुव्वधार बॅटिंग केल्यानं शेतकरी सुखावला असुन व आपला आनंद व्यक्त केला व लाडकी बहिण योजनेची सर्वत्र कौतुक होत आहे. या योजनेची माहिती आपल्या बैलांच्या पाठीवर दिसत होती.आमदार माणिकराव कोकाटे यांच्या कन्या जिल्हा परिषद सदस्या सिमिंतिनी कोकाटे यांनी या योजना लोकांना समजावून सांगताना बैलं सजावट करण्यासाठी या योजनेचा प्रचार व प्रसार केला जात असल्याचे दिसून येत आहेत..