Soybean subsidy सोयाबिन पिक अनुदान या शेतक-यांना मिळणार नाही पहा कोणाला मिळणार
सोयाबिन पिक अनुदान या शेतक-यांना मिळणार नाही पहा कोणाला मिळणार These farmers will not get soybean crop subsidy, see who will get it
वेगवान नाशिक/अरुण थोरे
नाशिक- २ सप्टेंबर 24 मागील वर्षीच्या सोयाबिन पिकाच्या अनुदानासाची पिक पाहणीची अट रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली, मात्र ही घोषणा हवेतच विरली असुन ३० ऑगस्ट रोजी आलेल्या नविन शासन निर्णयानुसार ई- पिक पाहणीची अट कायम असल्याचे अधोरेखित झाले असून, ई- पिक पहाणी नसलेल्या शेतकर्यांना अनुदान मिळणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. हेक्टरी ५००० हजार तर अर्धा एकर पेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकर्यांना सरसकट १००० इतके अनुदान मिळणार आहे. These farmers will not get soybean crop subsidy, see who will get it
याबाबत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी १० सप्टेंबरपासून अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना कृषीमंत्र्यानी घेतलेल्या आढावा बैठकीत केल्या आहे.
पण पात्र शेतकऱ्यांच्या नावाचा गोंधळ कायम असल्याने. व ई-पीक पाहणीची अट कायम असल्याने शेतकर्यांची नाराजी असुन. २०२३ च्या खरीप हंगामात ई पीक पाहणी करूनही सातबारावर सोयाबीन पिकाची नोंद नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांचे नाव अनुदान यादीत आले नसल्याची, तक्रार शेतकरी करत होते. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी परळीतील कार्यक्रमात भाषणा दरम्यान ई पीक पाहणी नोंदची अट रद्द करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांसमोर ई पीक पाहणी अट रद्द करण्याची घोषणा केली. परंतु अनुदान कार्यपद्धतीच्या शासन निर्णयात ई पीक पाहणी अट कायम असल्याचं स्पष्ट झालं आहे.
ई-पिक पाहणी ची अट रद्द झाली असती तर अनुदानचा लाभ सर्वच शेतकर्यांना मिळाला असता अशी खंत शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
अरुण थोरे गेल्या 3 वर्षापासून वेगवान मिडीया मध्ये काम करत असुन,पत्रकारितेची सुरुवात वेगवान सहमुहातुन झाली. सध्या वेगवान नाशिक मध्ये प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. निफाड तालुक्यातून शेती, राजकारण, क्राईम, विषयामध्ये चांगले ज्ञान असून शेतक-यांसाठी लेखन करण्याची आवड.