मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बैलाचा सोशल मिडीयावर धुमाकूळ (व्हिडीओ )
वेगवान नाशिक / मारुती जगधने
नाशिक, 2 आज पोळ्याचा सण असून संपूर्ण महाराष्ट्रात बैल पोळा हा सण साजरा केला जातो. जेंव्हा पासून सोशल माध्यमं आलं तेंव्हा पासून लोकांची कोण काय करतयं हे लगेच समजून जातं. सध्या सोशल मिडीयावर बैलाचा व्हिडीओ व्हायरलं होत आहे. हा बैल एकनाथ शिंदेच्या लाडकी बहिण योजना माहिती देऊन रंग रंगोटी करण्यात आल्याचे दिसते.
सध्या सोशल मिडीयावर लाडकी बहिण योजना मुख्यमंञी एकनाथ शिंदे असे सजविलेला सोन्या नावाचा पांढरा खिल्लर बैल सोशल.मिडीयावर धुमाकुळ घालत आहे.
या सोन्या बैलाचे ठिकाण समजले नाही कोणी सजविले ते कळाले नाही पण या सोन्या बैलाला उत्तंम प्रकारे सजवून त्याची पाच पाऊली केलेली असून दोन तरुन या बैलाला मिरवताना दिसत आहे. या बैलाचे फोटो आनेकांनी शेअर करून बैलपोळ्याच्या शुभेच्छा दिल्या आहे .
सोशल मिडायवर व्हायरलं होणार या बैलाचा ऐटबाज पण पाहून नेटकरी तुफान खुश असून लोक या रंगरंगोटीला दाद देत आहे. महाराष्ट्रात यंदा चांगला पाऊस पडल्यामुळे पोळा सण शेतकरी आनंदाने साजरा करत आहे.
View this post on Instagram