बाजरी पिकाची काढणी व कांदा लागवडीला पावसाच्या विश्रांतीचि गरज
बाजरी पिकाची काढणी व कांदा लागवडीला पावसाच्या विश्रांतीचि गरज
वेगवान नाशिक /मारुती जगधने
नांदगांव /दिनांक २ ऑगस्ट /नांदगांव शहर व पंचक्रोशीत आज सकाळी मध्यमस्वरुपाच्या पावसाला सुरुवात झाली पाऊस जेमतेंम पाऊनतास चालला त्यामुळे सर्वीकडे पाणीचपाणी झाले परंतु येणार्या पावसाने आता आडवे पडलेल्या बाजरीपिकांची नासाडी व्हायला सुरुवात झाली आहे पावसाने आठ दिवसाची उघडीप दिल्यास बाजरी पिकांची कापणी होऊन धान्याची साठवण करता य ई ल सध्या बाजरी पिकाची कापणी करुन लावणी करण्याचे काम जोरात चालू आहे.पोळा सण असल्याने शेतीकामे आज बंद आहेत बैलपोळ्याची तयारी चालू आहे .
पिकांना योग्य पाऊस होत आहे पण आजुन तालुक्याच्या पश्चिम व दक्षिण भागातील नदीनाले बंधारे कोरडे आहेत विहिरीना म्हणावे तसे पाणी उतरले नाही त्यामुळे तालुक्याचा काहीभाग टंचाईग्रस्त दिसून येतो नांदगांव शहरातुन वाहनारी शाकंबरी लेंडी व पांझन नदी या कोरड्या आहेत यांच्यावरील बंधारे व धरणे कोरडी आहेत त्यामुळे रब्बी हंगाम पिकांना मर्यादा आल्या आहे काही दिवस विश्राती दिल्यास बाजरी पिकांची कापणी व काढणी होईल पुन्हा पाऊस आल्यास रब्बी पिकांना लाभ होईल असे मत जानकार व्यक्त करतात.
वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये