Nashik NDCC बॅंकेत पैसे अडकले का? आता होतील मोकळे
नाशिक जिल्हा बँकेसाठी विशेष पॅकेज द्या. राजू शेट्टी यांची मागणी.
Wegwan Nashik / वेगवान नाशिक-
विशेष प्रतिनिधी,२ सप्टेंबर. गेल्या अनेक दिवसापासून स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक जिल्हा बँक वाचावी व शेतकऱ्यांना कर्ज मुक्ती मिळावी यासाठी संघर्ष करत आहे. अनेक शेतक-यांचे पैसे या बॅकेत अडकून पडले आहे. लोकांना पैशाची गरज आहे. मात्र ते मिळतं नाही. मात्र आता शेतक-यांसाठी राजू शेट्टीने थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकड घातलंय
चांगल्या क्रेडिट स्कोअरचे फायदे घ्या जाणून Credit score
महाराष्ट्रातून जाणार पुन्हा नवीन रेल्वे मार्गःकोणाची जाणार जमीन Railway Line
पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरावर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात बिऱ्हाड आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याचा शब्द सहकार मंत्री अतुल सावे व पालकमंत्री दादा भुसे यांनी दिला होता. परंतु गेले दोन वर्ष शासनाने याकडे दुर्लक्ष केले.
तमाशाच्या फडात नाचणा-या एका आईचा लेक असा झाला कलेक्टर
चांगल्या क्रेडिट स्कोअरचे फायदे घ्या जाणून Credit score
राजू शेट्टी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांनी अनेकदा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली. परंतु यावर काहीही पावले शासनाने उचलली नाही. म्हणून राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेऊन नाशिक जिल्हा बँकेला राज्य शासनाने मदत करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्रात जोरदार पावसाची ठोकाठाकीःहवामान विभागाला आलं टेन्शन !
Soybean subsidy सोयाबिन पिक अनुदान या शेतक-यांना मिळणार नाही पहा कोणाला मिळणार
नाशिक जिल्हा बँकेतील साधारणता तीस हजार शेतकरी हे भूमिहीन होण्याच्या मार्गावर आहे. घेतलेल्या कर्ज पेक्षा अनेक पटीने व्याज झाल्यामुळे त्यांना कर्ज फेड करणे शक्य नाही. शासनाने विशेष मदत केल्याशिवाय या शेतकऱ्यांना कर्ज मुक्ती मिळणार नाही. या शेतकऱ्यांना भूमीहीन होण्या पासून वाचवायचे असेल तर शासनाने जिल्हा बँकेला विशेष मदत केली पाहिजे ही सातत्याने मागणी होते आहे.
Maruti या कार झाल्या स्वस्त; खरेदी करण्याची अनमोल संधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील अनेकदा बैठका झाल्या. परंतु यावरती मार्ग निघाला नाही. नुकतेच राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नाशिक जिल्हा बँकेचा प्रश्न मार्गी लावा शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या अशी गळ घातली. निवडणुकीच्या तोंडावर नाशिक जिल्हा बँकेला मदत होण्याची अपेक्षा व्यक्त केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक जिल्हा बँकेला आम्ही मदत करणार असे आश्वासन दिले आहे.
तीस हजार शेतकरी भूमीहिन होऊ नये असे सरकारला वाटत असेल तर या सरकारने नाशिक जिल्हा बँकेला विशेष पॅकेज देणे गरजेचे आहे. राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बिऱ्हाड आंदोलनापासून या गोष्टीसाठी अनेकदा पाठपुरावा केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर जर जिल्हा बँकेला राज्य शासनाने मदत केली नाही तर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रोषाला लोकसभेप्रमाणेच विधानसभेला सुद्धा या सरकारला सामोरा जावे लागेल. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन विशेष पॅकेज सरकारने जिल्हा बँकेला द्यावे व जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमुक्ती द्यावी. ही आम्हाला अपेक्षा आहे.– संदीप जगताप प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना