नाशिक शहर

या शिक्षकांना मिळाला आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार 

महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारप्राप्त शिवयुवा प्रतिष्ठान सामाजिक संस्थेने केला सन्मान


Wegwan Nashik/वेगवान नाशिक
१ सप्टेंबर,विशेष प्रतिनिधी :-
   देवळाली कॅम्प येथील महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त प्रमोद मोजाड यांच्या शिवयुवा प्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्या वतीने काल येथील सिंधी पंचायत सभागृहात परिसरासह नाशिक व विविध जिल्ह्यातील ३४ शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षकरत्न पुरस्काराचे नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आले.     
  शिक्षक दिनाच्या निमित्ताने येथील पूज्य सिंधी पंचायत सभागृहात आमदार सत्यजित तांबे,शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर,उपजिल्हाप्रमुख केशव पोरजे, माजी आमदार योगेश घोलप,व्यापारी बँकेचे जनसंपर्क संचालक अरुण जाधव, मनसेचे खंडेराव मेढे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे, पोपट जाधव, भगूर केंद्रप्रमुख मोहनसिंग राठोड, साहेबराव चौधरी, सरपंच मोहनीश दोंदे, गोकुळ मोजाड, वैभव पाळदे,नितीन गायकवाड आदी मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी आमदार सत्यजित तांबे यांनी शासनाने शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक भूमिका घेणे गरजेचे असल्याचे नमूद केले. उपस्थित मान्यवरांची समयोचित भाषणे झाली त्यातून प्रत्येकानेच समाज घडविणाऱ्या शिक्षकांप्रती आपले विचार प्रगट केले. प्रास्ताविक प्रतिभा महाजन यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.  सूत्रसंचालन संतोष फासाटे यांनी करतांना स्व.लता मंगेशकर, ना. डॉ.शरद पवार,केंद्रीय मंत्री ना.रामदास आठवले यांच्या आवाजाची नक्कल सादर केली. आभार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मोजाड यांनी मानले. याप्रसंगी पंचक्रोशीसह विविवध जिल्ह्यातील विविध शाळांमधील माधुरी कुलकर्णी, लालगिरी गोसावी, विजय सानप,अनिल भंडारे, डॉ बन्सीलाल गाडीलोहार, देविदास वारुंगसे, वाल्मिक हिंगे,संगीता आहिरे, रंजना सोनवणे, कमल सोनवणे, जयमाला पाटोळे, रेखा पवार,लीना शिनकर, प्रवीण पानपाटील, बाळासाहबे वाघ, मनोज कनोजिया, मनीषा सांगळे, मीना पाटील, अर्चना आरोटे, शबनम सैय्यद,रामेश्वर खांडेभराड, सारिका निल्लेवार, सुनील धोंगडे, भाग्यश्री सालमुठे, शिवाजी फटांगरे, शेख जावेद (जळगाव ),योगेश वाघ, खंडू सांगळे, माधुरी गायकवाड, जयश्री पानसरे, जयश्री वाजे, रॉझलीन बनार्ड, आनंद कस्तुरे, सुरेश म्हैसधुणे, सतीश गावंडे (पुणे) या शिक्षकांचा
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देत आदर्श शिक्षकरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. यशस्वीतेसाठी जयदीप निसाळ, गणपत शेलार, विनोद डांगे, आकाश बोराडे, किरण भावले, सचिन थोरात आदींसह संस्थेचे सदस्य प्रयत्नशील होते. 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!