नाशिकममधील ‘या’ भागाचा पाणीप्रश्न मिटला
दारणा धरणातून भगूर नगरपरिषदेसाठी ६०६५ दलक्षघनफूट पाणी आरक्षिण-
भगूर येथील नगरपालिकेत राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत पाणी पुरवठा योजनेसाठी दारणा प्रकल्पातून घरगुती पिण्यासाठी वाढीव पाणी हक्क मंजूर करण्यात आला आहे. याकामी आमदार सरोज आहिरे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. याबाबतचा बिसिंआ २०२४/(२३२/२४) (सिं.व्य.)धो- २ प्रमाणे शासन निर्णय शुक्रवार दि.३० ऑगस्ट रोजी प्रकाशित करण्यात आला आहे.
भगूर नगरपरिषदेत हद्दीत २ हजार २०० इतके नळधारक आहे. मात्र उन्हाळ्यात प्रत्येकालाच पिण्याच्या पाण्याची टंचाईला सामोरे जावे लागते. हि समस्या लक्षात घेऊन आमदार सरोज आहिरे यांच्या मार्गदर्शनखाली भगूर नगरपालिकेने सादर केलेल्या नव्या पाणी वाढीव प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. आगामी २०५० ची लोकसंख्या लक्षात घेता गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ यांचे संदर्भ पत्रानुसार महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत भगूर नगरपरिषदेसाठी ६०६५ दलक्षघनफूट इतका पाणी आरक्षण मंजूर झाले आहे. याकमी सुमारे २५ कोटी रु.पाणी पुरवठा योजना राबविण्यात येणार आहे २५० मिमी व्यासाची पाईपलाईन थेट दारणा धरणातून भगूरच्या पश्चिमेस असलेल्या सध्याच्या फिल्टरेशन प्लांट पर्यंत आणण्यात येणार आहे. त्यासाठीचा अंतिम मंजुरी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचेकडे अंतिम सहीसाठी प्रलंबित आहे. ती मंजुरी मिळताच या योजनेच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. यामुळे भगूरवासियांचे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली लागणार आहे.