नाशिक ग्रामीण

नांदगाव तालुक्यात आता या ठिकाणी होणार शेतीमालाचे लिलाव

नांदगाव तालुक्यात आता या ठिकाणी होणाल शेतीमालाचे लिलाव


वेगवान नाशिक / मारुती जगधने

नांदगांव : तालुक्यातील वेहळगांव गणातील शेतकर्यांचे हित लक्षात घेता तालुक्यातील वेहळगांव येथे शेतीमालाचे लिलाव तथा बाजार भरविण्याची परवानगी मिळाल्याची माहिती नवनिर्वाचीत सभापती सतीश बोरसे यांनी प्रसिद्धीला दिली आहे .In Nandgaon taluka, the auction of agricultural produce will now be held at this place

तुम्हाला क्रिडेट कार्ड हवे आहे का, तर CIBIL स्कोर किती पाहिजेत

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

नाशिकममधील ‘या’ भागाचा पाणीप्रश्न मिटला

वेहळगांव येथे शेतीमाल लिलाव सुरु झाल्यास पंचक्रोशीतील सुमारे २० गांवाना त्याचा लाभ होईल वेहळगांव पंचक्रोशीत शेतिमालाची बाजारपेठ नसल्याने शेतकर्याचे हाल होत असे बाजार समितीच्या निर्णयाचे पंचक्रोशितील शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले.तसेच वेहळगांव ग्रांमपंचायतीने बाजारसाठी पाच हेक्टर जागा उपलब्ध करुन दिली आहे .

आता फक्त महाराष्ट्रातील शेतक-यांच्या खात्यावर पुन्हा पैसे जमा होणार Subsidy of farmers

नवीन मोबाईल घेण्याचा विचार करताय मग आता मोठा डिस्काउंट आणि तोही या भावात

याबाबत सभापती सतिष बोरसे यांनी दिलेल्या माहिती नुसार वेहेळगांव येथे बाजार समितीने शेतमाल लिलाव सुरू करावा अशी मागणी वेहेळगांव सह पंचक्रोशीतील शेतकर्यांची होती. याबाबत वेहेळगांव ग्रामपंचायतीने त्यांचे मालिकीची सदर खरेदी केंद्रासाठी ५ हेक्टर जागा कराराने उपलब्ध करून दिलेली असून याबाबत ग्रामपंचायत सरपंच सौ. वर्षा प्रमोद भाबड , उपसरपंच , व ग्रामपंचायत सदस्य तसेच मजूर फेडरशनचे संचालक तथा नांदगांव बाजार समिचे माजी उपसभापती प्रमोद भाबड , वेहेळगांव येथील बाजार समितीचे संचालक पोपट सानप व ग्रामस्थांचे सहकार्य मिळाल्याने सदर खरेदी केंद्रास आमदार सुहास कांदे यांचे प्रयत्नातून जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी यांनी मंजूरी दिल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

दिवाळी व छठ पूजेसाठी या मार्गावर धावणार विशेष प्रवासी रेल्वे गाड्या

निप्टीच्या इतिहासात पहिल्यांदा बाजार उठला..या शेयर्स मध्ये जोरदार आली तेजी

सदर वेहेळगांव खरेदी केंद्रामुळे वेहेळगांव सह परिसरातील कळमदरी , जामदरी , पळाशी , सावरगांव , मंगळणे , आमोदे , बोराळे , मळगांव , न्यू पांझण , मुळडोंगरी , बिरोळा , रणखेडा , चांदोरा , तळवाडे आदि गावांसह चाळीसगांव तालुक्यातील पिलखोड , सायगांव , उंबरदे , नरडाणे आदि गावांतील शेतकरी वर्गाचा प्रामुख्याने मका , कांदा हा शेतमाल विक्रीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या खरेदी केंद्राच्या मंजूरी प्रस्तावास ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे , रामेश बोरसे , विलासभाऊ आहेर , राजेश कवडे , तेज कवडे , विष्णू निकम या नेत्यांसह बाजार समितीचे उपसभापती दिपक मोरे , सचिव अमोल खैरनार यांचेसह सर्व संचालक मंडळाचे सहकार्य मिळालेले असून लवकरच सदर खरेदी केंद्रा करिता वेहेळगांव , पिलखोड या भागांसह इतरही भागातील व्यापारी वर्गास खरेदीचा परवाना दिला जाणार असून शेतमाल खरेदी केंद्राचे उद्घाटन नांदगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार सुहास कांदे यांचे हस्ते व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. माझे कार्यकाळात सदर वेहेळगाव खरेदी केंद्र सुरू होणार असल्याने मनस्वी आनंद होत असल्याची भावना सभापती सतिष बोरसे यांनी व्यक्त केली


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!