नाशिक ग्रामीण

शेतक-यांची लुट पहा कशी होते, शेतकरी एक पावत्या दोन

Farmers see one invoice two, this confusion of the market committee


वेगवान नाशिक / मारुती जगधने

नांदगाव, ता. 1 सप्टेंबर 2024 – Nashik news1 नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची लुट ? एकाच कांदा विक्रीच्या दोन पावत्या १) काटापट्टी २) हिशोबपट्टी व त्या दोन्ही पावत्या मधील एकूण रक्कमेत फरक ? याचा लेखी खुलासा मागितला असता सचिवांनी मौन बाळगलेल्या ? या बाबत. तक्रारदार जगन्नाथ प्रतापराव पाटील राहणार न्यायडोंगरी यांनी दिलेल्या लेखी तक्रार अर्जानुसार त्यांनी दिनांक १६/०८/२०२४ रोजी नांदगांव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्रीसाठी आणलेला होता.

 

 

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

सदरचा कांदा व्यापारी भिवराज भगीरथ फोफलिया (राहुल ट्रेडर्स )यांनी १६११ रुपये प्रती क्विंटल या दराने विकत घेतला त्याचे वजन ६.८० (सहा क्विंटल ऐंशी किलो )आले असून त्याची एकूण रक्कम १०९५५ इतकी झालेली आहे तशी हीशोब पट्टी पावती क्रमांक ५४६ मला देण्यात आलेली आहे, परंतु काटा पट्टी नंबर १०६८४६३ मध्ये मात्र एकूण खर्च ८२.९६ वजा करून मला १०८७२ रूपये रोख देण्यात आले आहेत.

 

सदरचा खर्च कशाचा कापुन घेण्यात आला या बाबत कोणताही खुलासा या काटा पट्टी वर करण्यात आलेला नाही ?तर हिशोब पट्टीवर मात्र खर्च हे सदर निरंक दाखविण्यात आलेले आहे व तश्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा शिक्का असलेल्या दोन पावत्या पाटील यांना देण्यात आलेल्या आहेत .

 

एकाच मालाची विक्री झालेल्या एकाच वजनाच्या एकाच दर असलेल्या दोन पावत्या असून दोघा पावत्यावरीलच्या रकमेमध्ये मात्र तफावत आहे .त्यामुळे या अशा पद्धतीच्या पावत्या कोणत्या नियमाच्या आधारे व का देण्यात येतात तसेच यात खर्चापोटी वजा करण्यात आलेली रक्कम ही नेमकी कोणत्या खर्चा पोटी  वजा करण्यात आली.

 

 

याबाबतचा लेखी खुलासा त्वरित करण्यात यावा अशी लेखी तक्रार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व सचिव यांचे कडे करून लेखी खुलासा मागितला असता तक्रार करून पाच दिवस झाले तरीही कोणताही खुलासा करण्यात आलेला नसून या बाबत कृषी उत्पन्न बाजार समिती कडून मौन बाळगन्यात आले आहे .

 

तेंव्हा अश्या विना तपशील अंदाजे खर्च कपात करून शेतकऱ्यांना खुलेआम नाडले जात असल्याने याचा जाहीर खुलासा बाजार समिती, यांनी करावा असे खुले आवाहन पाटील यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!