सरकारी माहिती

दिवाळी व छठ पूजेसाठी या मार्गावर धावणार विशेष प्रवासी रेल्वे गाड्या

5 सप्टेंबर पासून होणार संगणकीकृत आरक्षण उपलब्ध


वेगवान नाशिक/Wegwan Nashik –                                 विशेष प्रतिनिधी-31 ऑगस्ट:- 

दिवाळी आणि छठ पूजा यांच्या उत्सवी हंगामात प्रवाशांची सोय आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेलवेने विशेष गाडी सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या उच्च प्रवाशांच्या आरामदायक प्रवास सुनिश्चित करण्यास मदत करतील.

विशेष गाड्यांची माहिती पुढीलप्रमाणे 

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

१) लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई -बनारस विशेष ४ सेवा

०१०५३ विशेष दिनांक ३०.१०.२०२४ आणि ०६.११.२०२४ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून १२.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १६.०५ वाजता बनारस येथे पोहचेल.

०१०५४ विशेष दिनांक ३१.१०.२०२४ आणि ०७.११.२०२४ रोजी बनारस येथून २०.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २३.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहचेल.

थांबे -: कल्याण, इगतपुरी ,नासिक, भुसावल, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी आणि वाराणसी.

संरचना: ६ वातानुकूलित-तृतीय, १० शयनयान, २ जनरल सेकंड क्लाससह २ लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन. (२० डब्बे)

२) लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – दानापूर विशेष ८ सेवा

०१००९ विशेष द्वि साप्ताहिक दिनांक २६.१०.२०२४ ते ०४.११.२०२४ पर्यंत शनिवारी आणि सोमवार रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून १२.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १७.०० वाजता दानापुर येथे पोहचेल.

०१०१० विशेष द्वि साप्ताहिक दिनांक २७.१०.२०२४ ते ०५.११.२०२४ पर्यंत रविवार आणि मंगळवार रोजी दानापूर येथून १८.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २३.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहचेल.

थांबे -: कल्याण, इगतपुरी ,नासिक, भुसावल, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दिन दयाळ उपाध्याय , बक्सर आणि आरा.

संरचना: ६ वातानुकूलित-तृतीय, १० शयनयान, २ जनरल सेकंड क्लाससह २ लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन. (२० डब्बे)

३) लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – समस्तीपूर विशेष ४ सेवा

०१०४३ विशेष दिनांक ३१.१०.२०२४ आणि ०७.११.२०२४ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून १२.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १८.१५ वाजता समस्तीपूर येथे पोहचेल.

०१०४४ विशेष दिनांक ०१.११.२०२४ आणि ०८.११.२०२४ रोजी समस्तीपूर येथून २३.२० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०७.४० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहचेल.

थांबे -: कल्याण, इगतपुरी ,नासिक, भुसावल, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दिन दयाळ उपाध्याय , बक्सर, आरा, दानापुर, पाटलीपुत्र, हाजीपूर आणि मुजफ्फरपूर.

संरचना: ६ वातानुकूलित-तृतीय, १० शयनयान, २ जनरल सेकंड क्लाससह २ लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन. (२० डब्बे)

४) लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – प्रयागराज विशेष ४ सेवा

०१०४५ विशेष दिनांक २९.१०.२०२४ आणि ०५.११.२०२४ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून १२.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११.२० वाजता प्रयागराज येथे पोहचेल.

०१०४६ विशेष दिनांक ३०.१०.२०२४ आणि ०६.११.२०२४ रोजी प्रयागराज येथून १८.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १६.०५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहचेल.

थांबे -: कल्याण, नासिक, भुसावल, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, शंकरगढ.

संरचना: २ वातानुकूलित-तृतीय, ८ शयनयान, ६ जनरल सेकंड क्लाससह २ लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन. (१८ डब्बे)

५) लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – गोरखपूर विशेष ८ सेवा

०११२३ विशेष द्वि साप्ताहिक दिनांक २५.१०.२०२४ ते ०३.११.२०२४ पर्यंत शुक्रवार आणि रविवार रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून १२.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १८.५५ वाजता गोरखपूर येथे पोहचेल.

०११२४ विशेष द्वि साप्ताहिक दिनांक २६.१०.२०२४ ते ०४.११.२०२४ पर्यंत शनिवार आणि सोमवार रोजी गोरखपूर येथून २१.१५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०७.२५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहचेल.

थांबे -: ठाणे,कल्याण, इगतपुरी, नासिक रोड, भुसावल, खंडवा, इटारसी, भोपाल, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन, ओराई, कानपूर, लखनऊ, बाराबंकी, गोंडा आणि बस्ती.

संरचना: २ वातानुकूलित-तृतीय, ८ शयनयान, ६ जनरल सेकंड क्लाससह २ लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन. (१८ डब्बे)

६) पुणे -गोरखपूर विशेष ४ सेवा

०१४३१ विशेष दिनांक २५.१०.२०२४ आणि ०१.११.२०२४ रोजी पुणे येथून १६.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २०.४० वाजता गोरखपूर येथे पोहचेल.

०१४३२ विशेष दिनांक २६.१०.२०२४ आणि ०२.११.२०२४ रोजी गोरखपूर येथून २३.२५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०६.२५ वाजता पुणे येथे पोहचेल.

थांबे -: दौड़ कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाँव, मनमाड, भुसावल, खंडवा, इटारसी, भोपाल, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन, ओराई, कानपूर, लखनऊ,गोंडा ,मनकापूर, बस्ती आणि खालिदाबाद.

संरचना: २ वातानुकूलित-तृतीय, ८ शयनयान, ६ जनरल सेकंड क्लाससह २ लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन. (१८ डब्बे)

आरक्षण: विशेष ट्रेन 01053, 01009, 01043, 01045, 01046, 01123 आणि 01431 साठी विशेष शुल्कावर बुकिंग दि. 05.09.2024 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर उघडेल.

विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा. प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!