शेवटी डोंगरगाव धरणात पाणी पडलो..हो..भुजबळ साहेबांचा जय हो..
शेवटी डोंगरगाव धरणात पाणी पडलो..हो..भुजबळ साहेबांचा जय हो..
वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव
येवला ,दि.31 ऑगस्ट:- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मांजरपाडा प्रकल्पातून दरसवाडी धरण ओव्हर फ्लो झाले असून दिनांक 26ऑगस्ट रोजी दुपारी 3वाजता दरसवाडी धरणावर कालव्या चे गेट खोलण्यात आले व वेगाने दिनांक 31ऑगस्ट रोजी सायंकाळी 161किलोमीटर अंतर पार करीत दाखल झाले झाले.
आता फक्त महाराष्ट्रातील शेतक-यांच्या खात्यावर पुन्हा पैसे जमा होणार Subsidy of farmers
मंत्री भुजबळ यांच्या हस्ते बंधऱ्यात पूजन झाले त्यावेळी जलपूजन करण्यात येऊन . त्यामुळे येवल्यातील सतत उत्तर पूर्व दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळला आहे.
तुम्हाला क्रिडेट कार्ड हवे आहे का, तर CIBIL स्कोर किती पाहिजेत
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांजरपाडा प्रकल्पाच्या पाण्याने पुणेगाव व दरसवाडी तलाव ओव्हरफ्लो झाले असून दरसवाडी धरणातून पाणी जलपूजन करून येवला तालुक्यासाठी सोडण्यात आले आहे. दरसवाडी ते डोंगरगाव या दरम्यान काँक्रीटीकरण अधिक झाले असल्याने पाणी कमीतकमी वेळेत डोंगरगाव येथे पोहचले.
आग..ग..ग.. जावा Jawa Yezdi आली भो! एवढ्या वर्षाने नव्या रुपात
पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याचे काम सन १९७२ ला सुरू झाले. सन २००४ साली मंत्री छगन भुजबळ हे येवला विधानसभा मतदारसंघातुन निवडून आल्यानंतर या कालव्याचे नूतनीकरण करण्यास चालना दिली. मात्र दरसवाडी धरणातून येवला तालुक्यासाठी फक्त ओव्हरफ्लोचे पाणी मिळणार होते. हे पाणी पुरेसे नसल्याने मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून मांजरपाडा प्रकल्पाची निर्मिती करून गुजरातला जाणारे पाणी अडवण्यात येऊन बोगद्याद्वारे पुणेगाव धरणात आणण्यात येऊन तेथून दरसवाडी धरणात टाकण्यात येत आहे. त्यातून हे पाणी दरसवाडी डोंगरगाव कालव्याच्या माध्यमातून येवला व चांदवड बंधारे भरण्यात येत आहे.
तुम्हाला क्रिडेट कार्ड हवे आहे का, तर CIBIL स्कोर किती पाहिजेत
अनेक अडचणींना तोंड देत हा प्रकल्प पूर्ण झाला असून दरसवाडी ते डोंगरगाव कालव्याचेही काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. सुमारे ४० ते ४५ वर्षांनंतर मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून हे शक्य झाले आहे. त्यामुळे येवला व चांदवड तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरयांना सुगीचे दिवस येणार आहे.
1 वर्षात 1 लाखाचे 66 लाख झाले, पहा कसं झाले हे शक्य
दरसवाडी कालव्यातून हे पाणी येवल्याच्या दिशेचे जोरात प्रवाहित होऊन ते डोंगरगाव धरणात दिनांक 30ऑगस्ट रोजी सायंकाळी पोहोचले आहे. या पाण्यामुळे चांदवड व येवला, वैजापूर तालुक्यातील दुष्काळी भागाचा सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे उत्सवाचे वातावरण आहे. डोंगरगाव धरणात कालव्याचे पाणी आल्यामुळे शेतकऱ्यांनी फटाके फोडून पेढे वाटून मंत्री छगन भुजबळ यांचा जयघोष करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये वातावरण पसरले आहे
विहीर करण्यासाठी सरकार देणार पैसे , पैसा नाही एवढे लाख देणार
वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये