टोमॅटो कंपनीने काढेल बोगस बियाणे, शेतकरी असला तर सावधान

वेगवान नाशिक / शशीकांत बिरारी
कंदाणे, नाशिक,ता. जायखेडा ता.बागलाण येथील 13 शेतकऱ्यांनी नामपूर येथील बालाजी हायटेक नर्सरी येथून अमेरिकन हायब्रीड सिडस इंडिया प्रा.लि.बॅंगलोर कंपनीद्वारे उत्पादीत टोमॅटो वाण Indam 1320 रोपांची शेतात काबाडकष्ट करून टोमॅटो लागवड केली होती .
वेळोवेळी औषधफवारणी केली मात्र टोमॅटोच्या झाडांवर फुलोरासह फळधारणा अत्यल्प प्रमाणात आल्याचे दिसून आल्याने या शेतकऱ्यांनी संबधित नर्सरी मालक व कंपनी प्रतिनिधी कडे तक्रार दाखल केली होती.पण शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीची कोणतीही दखल संबंधितांनी न घेता नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात कंपनीकडून उडवाउडवीची उत्तरे देत टाळाटाळ केली जात आहे.
कंपनी प्रशासनाकडून जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला फक्त आश्वांनाची खैरात दिली जात असून प्रत्यक्षात मात्र बळीराजाला अद्याप कोणतीही आर्थिक मदत कंपनी प्रशासनाकडून दिली जात नसल्याने येत्या पाच दिवसांत आम्हाला न्याय मिळाला नाही तर 13 नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी कुटुंबातील सदस्यांना बरोबर घेऊन कृषी विभागाच्या कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे.
संबंधीत दाद देत नसल्याने शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार दाखल केली होती.यानुसार कृषी विभागाने या तक्रारीची दखल घेत तालूकास्तरीय तक्रार निवारण समिती मार्फत पाहाणी करून नुकसान ग्रस्त क्षेत्राचा पंचनामा केला आहे.पाहाणी समितीच्या पाहाणी दरम्यान तक्रारीत तथ्य असल्याचं निर्वाळा दिला आहे.कंपनी प्रशासनाकडून कृषी विभागाच्या अहवालाही न जुमानता एकप्रकारे ठेंगा दाखवण्याचा प्रकार चालवला जात आहे.चर्चेसाठी आज येतो उद्या येतो अशी चेष्टा कंपनी प्रशासनाकडून बळीराजाची चालवली जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
तालुक्यातील जायखेडा शिवारातील शेतकरी महेद्र बापु बच्छाव व दिपक वामन खैरनार व इतर तेरा शेतकरी हे गेल्या ८ ते १० वर्षपासुन नियमित टोमॅटो पिकाची लागवड करीत असतात सदर शेतक-यांनी यावर्षीदेखील मे. बालाजी हायटेक नर्सरी नामपुर येथुन रोपे खरेदी केले व लागवड केली लागवडीनंतर शेतकरी यांनी रोपांची काळजी घेतली वेळोवळी किटकनाशके बुरशीनाशके यांची फवारणी केली तसेच विद्राव्य खते जड खते सुक्ष्म अन्नद्रव्ये यांचेदेखील योग्य नियोजन केलेले होते. परंतु ऐन फळधारणेच्या वेळी फुलधारणा व फळधारणा यांचेप्रमाण अत्यल्प असल्याचे दिसुन आले
. लक्षात आल्यानंतर संबंधित शेतक-यांनी नर्सरी व कंपनी यांना संपर्क केला कंपनीने लक्ष दिले नाही त्यामुळे शेतक-यांनी नाईलाजाने कृषि विभागाकडे संपर्क केला कृषि विभागाने त्वरीत तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीमार्फत २६ जुलै २०२४ रोजी पंचनामा केला. पाहणीदरम्यान फुलधारणा व फळधारणा अत्यल्प असल्याचे समितीच्या लक्षांत आले त्याप्रमाणे समितीने अहवाल दिलां शेतक-यांच्या म्हणनेनुसार कृषि विभागाने शेतक-यांना योग्य मार्गदर्शन केलेले आहे .
परंतु बियाणे उत्पादक कंपनी आजही त्यांचेकडे लक्ष देत नाही. आमचे जे नुकसान झालेले आहे. त्याची कंपनीने त्वरीत भरपाई द्यावी अशी मागणी शेतक-यांमार्फत केली जात आहे. त्याचप्रमाणे कंपनीने आमचे झालेले नुकसान भरपाई न दिल्यास उपोषणांस बसण्याचा इशारा वसंत अहिरे, नारायण शेवाळे, निलेश बच्छाव, चंद्रकांत पठाडे, मोहन सोनवणे,बाळू सोनवणे, दावल जगताप, चंद्रकांत पठाडे सुमनबाई जगताप तुळशीदास बच्छाव त्र्यंबक जगताप अशोक बागुल महिंद्र बच्छाव आधी शेतकऱ्यांनी दिला आहे.
.
… चौकट..
शासनान कडून दरवर्षी बोगस बियाणे खते, विक्री, करणाऱ्या कंपन्यांना वर कारवाई साठी कठोर नियमावली तयार केली आहे.पण काही कंपन्या या नियमाला हरताळ फासून दरवर्षी आपलं चांगभलं करत असतात.बोगस बियाणे बाबत कंपनी प्रतिनिधींना कळवले तरी ते मुजोरी करुन जे होईल ते करून घ्या असा दम जगाच्या पोशिंदा असलेल्या बळीराजाला देतात ते कोणाच्या पाठबळावर? याची ही चौकशी या प्रकरणी झाली पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली आहे.कृषी विभागाने अहवाल दिला असताना सुद्धा कंपनी प्रशासनाकडून मुजोरी दाखवली जात आहे.ती कोणाच्या जीवावर हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
