नाशिक ग्रामीण

येवला चांदवड तालुक्याचं भविष्य भुजबळांच्या भगीरथी रूपाने बदललं


वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव

येवला 30ऑगस्ट  – पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्याचे पाणी येवल्यात आणण्याचे येवलेकरांनी बघितलेले स्वप्न अखेर ५२ वर्षांनी प्रत्यक्षात उतरले आहे. जवळपास तीन पिढ्यांनी बघितलेले हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांचा सिंहाचा वाटा आहे. प्रवाही पद्धतीने १६१ किलोमीटर प्रवास करून पाणी अखेर येवल्यात पोहोचल्याने एखाद्या भागाचे नेतृत्व पाणीदार असेल व जनतेचे प्रश्न सोडविण्याबाबत प्रामाणिक असेल तर अशक्य वाटणारी कामेही पूर्ण होऊ शकतात, याचा वास्तुपाठ या प्रकल्पाने घालून दिला आहे.

आग..ग..ग.. जावा Jawa Yezdi आली भो! एवढ्या वर्षाने नव्या रुपात

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

येवल्याचे माजी आमदार स्व.जनार्दन पाटील यांच्या प्रयत्नांतून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून या कालव्याचे खोदकाम झाले. त्यानंतर निवडून आलेल्या सर्वच आमदारांनी आपापल्यापरीने याबाबत पाठपुरावा केला. येवल्याचे पालकत्व स्वीकारल्या नंतर छगन भुजबळ यांनी सन २००४ मध्ये येवल्यातून राजकीय कारकीर्द घडवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा येवल्याचे माजी आमदार जनार्दन पाटील यांच्या कार्यकाळात सुरू झालेले कालव्याच्या अपूर्ण कामांचे अवशेष एवढीच बाब दृश्य स्वरूपात दिसत होती.

तुम्हाला क्रिडेट कार्ड हवे आहे का, तर CIBIL स्कोर किती पाहिजेत

पुणेगाव कालव्याची वहनक्षमता व त्यातून चांदवड व येवला तालुक्यांसाठी आरक्षित असलेले पाणी याचा विचार करता हे पाणी येवला तालुक्यातील बंधाऱ्यांपर्यंत पोहोचणे ही केवळ एक कविकल्पनाच होती. ते आरक्षित पाणी दरसवाडीपर्यंत येताच संपत होते. त्यासाठी पुणेगाव धरणातील पाण्याव्यतिरिक्त नवीन पाणी उपलब्ध करणे हाच मार्ग होता. त्यासाठी मांजरपाडा वळण योजना राबविण्याची गरज होती. पण त्यासाठी सुरगाणा तालुक्यातील देवसाने गावाजवळील नदीवर धरण बांधून ते पाणी वेगवेगळ्या डोंगरांना बोगदे करून, ते पुणेगाव धरणाजवळ आणून त्यात सोडण्याची गरज होती. त्यासाठी जवळपास दहा किलोमीटर लांबीचे बोगदे तयार करून ते पाणी आणण्याची गरज होती. प्रत्यक्षात मांजरपाडा प्रकल्पामुळे केवळ ६०६ दलघफू पाणी उपलब्ध होणार असल्याच्या तुलनेत या बोगद्यांसाठी होणारा खर्च खूप मोठा होता. त्यामुळे जलसंधारणाच्या कोणत्याही योजनेच्या अनुषंगाने हा प्रकल्प अव्यवहार्य होता. त्याला मान्यता मिळवणे ही अवघड बाब होती.

नाशिक मधील हा रस्ता होणार चकाचक

मात्र, मांजरापाडा प्रकल्प करून त्याचे पाणी येवल्याला पोहोचवायाचेच, असा चंग बांधलेल्या भुजबळांनी प्रकल्पाच्या खर्चाच्या नियमापेक्षा दुष्काळी लोकांसाठी पाण्याची किंमत मोठी असते, हे सरकारी अधिकारी व संबंधित मंत्र्यांच्या गळी उतरवले. त्यामुळे हा प्रकल्प मंजूर झाला व सरकारने आतापर्यंत या प्रकल्पाला चारवेळा सुधारित प्रशासकीय मान्यता देत प्रकल्प पूर्ण केला. या प्रकल्पाचे काम सुरू असतानाच राज्यात सत्तांतर झाले. त्यामुळे या प्रकल्पाच्या त्रुटींवर बोट ठेवत काही काळ काम बंद ठेवण्यात आले. त्यानंतर श्री. भुजबळ यांना जवळपास दोन-अडीच वर्षे तुरुंगात जावे लागले. आपल्या तुरुंगवासाचा या प्रकल्पाला फटका बसू नये म्हणून त्यांनी तेथूनही राज्य सरकारला मांजरपाडा प्रकल्पाचे काम सुरू ठेवण्याकरिता निधी मंजूर करण्यासाठी पत्रव्यवहार सुरू ठेवला. यामुळे तत्कालीन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता देत उर्वरित दीड किलोमीटर बोगद्याचे काम पूर्ण केले.

सोन्याच्या भावाने घेतलं लोळवणं चांदी बाईचा झाला वांदा Today’s price of gold and silver

बोगदा पूर्ण होऊन २०१८ मध्ये पहिल्यांदा या बोगद्यातून पाणी पुणेगाव धरणात पडले. मात्र, प्रश्न केवळ पाणी धरणापर्यंत आणण्याचा नव्हता. या धरणातून पाणी येवल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आणखी प्रयत्नांची गरज होती. या कालव्यातून दरसवाडीपर्यंत पाणी पोहोचवणे व ते धरण भरल्यानंतर तेथून येवल्यापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी तो कालवा किमान दोन महिने चालवण्याची गरज होती. मात्र, त्यासाठी मांजरपाडा बोगद्यातून दोन महिने प्रवाह सुरू असणे गरजेचे होते. प्रत्यक्षात चार-पाच वर्षांतून एखाद्या वर्षीच त्या बोगद्यातून दोन महिने पाणी येत असते. त्यातच पुणेगाव धरणाची क्षमता आधीच कमी असल्यामुळे बोगद्यातून पाणी बंद झाल्यानंतर धरणातून कालव्याला पाणी सोडणे बंद होते. पुणेगाव कालव्याची दुरवस्था लक्षात घेता त्यातून येवल्याला पाणी पोहोचविणे शक्यच नव्हते. त्यामुळे या कालव्याचे अस्तरीकरण करून वेगाने पाणी नेणे हाच पर्याय होता.

जे नको व्हायला तेच झालं..चक्रीवादळाने भयकंर रुप धारण केलं

त्यासाठी पुन्हा निधी मागणीची गरज होती. त्यासाठीचा आराखडा तयार करून त्याला राज्यस्तरीय तांत्रिक मान्यता समितीची मंजुरी घेतली. त्यानंतर दोनच महिन्यांत राज्यात सत्तांतर झाले. मात्र, श्री. भुजबळ यांनी पाठपुरावा सोडला नाही. त्यांचा पाठपुरावा व दुष्काळी भागाची पाण्याची निकड लक्षात घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. यामुळे पुणेगाव ते दरसवाडी व दरसवाडी ते डोंगरगाव या दोन टप्प्यांत कालव्यांना २४२ कोटी रुपये निधी मंजूर झाला व कालव्याचे अस्तरीकरण सुरू झाले. त्यात पुणेगाव ते दरसवाडी कालवा विस्तारीकरण, अस्तरीकरण या ६३ किलोमीटर कामासाठी ९६ कोटी रुपये व उर्वरित १४६ कोटी निधीतून ३७ किमी ते ६३ किमी येथे मशिनने कालवा लेव्हल आणि दरसवाडी ते डोंगरगावच्या ८८ किलोमीटर कामांचा समावेश आहे. त्यानंतर जवळपास दोन वर्षांमध्ये ही कामे पूर्णत्वास पोहोचली आहेत.

यंदाच्या पावसाळ्यात पाणी आणण्याचा जणू चंग बांधण्यात आला होता. त्यानुसार पुणेगाव कालव्यातून ५ ऑगस्टला पाणी सोडण्यात आले. दरम्यान, मधल्या काळात कालवा फुटल्यामुळे तीन दिवस पाणी बंद करण्यात आले. त्यानंतर पुन्हा २५ ऑगस्टला दोन दिवस कालव्यातून प्रवाह बंद होता. याचा विचार केल्यास केवळ १८ तासात या विक्रमी वेळेत दरसवाडीमधून सोडलेले पाणी येवल्याच्या हद्दीत पोहोचले आहे. यामुळे केवळ यंदापुरतेच नाही, तर दरवर्षी या कालव्यातून येवल्यात पाणी पोहोचणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आता येवल्याच्या ईशान्य भागातील बंधारे या पूरपाण्याने भरून दिले जातील. तसेच दरवर्षी पावसाळ्यात पूरपाणी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था झाली आहे. यामुळे येवल्यातील सिंचन क्षेत्रात मोठी वाढ होणार आहे.शब्दांकन संतोष खेरणार


एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!