खऱ्या अर्थाने कर्तुत्व सिद्ध केले,,, हरिभाऊ सोनवणे
खऱ्या अर्थाने कर्तुत्व सिद्ध केले,,, हरिभाऊ सोनवणे
वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव
येवला दिनांक /30ऑगस्ट /मुंबई सोडल्यानंतर आदरणीय छगन भुजबळ साहेब यांना2004 साली जुन्नर मतदार संघातून लढण्याची गळ घालण्यात आली होती
त्याच वेळेस आदरणीय भुजबळ साहेब यांनी जुन्नरकरांना सांगितले की, तुमच्या जुन्नर मध्ये पाण्याचे पाच धरण आहेत त्यातून तुम्हाला पाणी मिळते परंतु महाराष्ट्रात सर्वाधिक दुष्काळी मतदारसंघ म्हणजे येवला तिथे गेलो तर तिथे माझ्या कामाचं कर्तृत्व मला दाखवता येईल .आणि हाच शब्द खऱ्या अर्थाने आज मांजरपाड्याचं पाणी येवल्यात आणून भुजबळ साहेबांनी सिद्ध केला आहे
प्रशासनावर असलेला आपल्या कामाचा दरारा आणि धमकही दाखवून दिली आहे.गेल्या चार दिवसापासून मांजरपाडाचे पाणी डोंगरगाव कडे सुरू आहे. प्रथमच आपल्या भागात पाटाला सुरू झालेले पाणी पाहून परिसरातील अबालवृद्ध पाण्यात उतरून आकाशी गुलालाची उधळण करून भुजबळ साहेबांचा जयजयकार करीत पाण्याची पूजा करून आनंद साजरा करीत आहे .
गावोगावी गुढ्या उभारून लोक रात्रंदिवस जागरण करीत आहे. डीजे लावून आबालवृद्ध संगीताच्या ठेक्यावर आनंदोत्सव साजरा करत आहे.
पाण्यात उतरून गुलालाची उधळण करून नारळ वाहून कोणी साड्या वाहून भुजबळ साहेबांचा जयकार करत आहे.वीस वर्षांमध्ये काम करताना कामांमध्ये अनंत अडचणी आल्या
मात्र कार्यसम्राट भुजबळ साहेबांनी आलेल्या प्रत्येक अडचणीवर मात करत हे पाणी येवला तालुक्यात कसे पोहोचणार याचा विचार करून अखेर पाणी येवल्यातील डोंगरगाव च्या धरणात आणले . वर्षानुवर्ष या भागातील नागरिकांच्या घशाला लागलेली कोरड यामुळे शांत होणार आहे.*
*हरिभाऊ सोनवणे,प्रगतीशील शेतकरी
वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये