दिंडोरी तालुक्यातील ह्या स्मशानभूमीची झाली दुरावस्था
वेगवान नाशिक/सागर मोर
वणी :येथील अमरधाम स्मशानभूमीची दुरावस्था झाली आहे.या ठिकाणच्या स्मशानभूमीचे शेडचे पत्रे जिर्ण झाले असुन काही पत्रे उडून गेल्याने पावसाचे पाणी अंत्यसंस्कारच्या वेळी संपूर्ण शेड गळत असल्याने अंत्यसंस्कारास मोठ्याप्रमाणात अडचण निर्माण होत आहे.अंत्यसंस्कारास आलेले आप्तेष्ट नातेवाईक दुखःत असतांनाच पावसाच्या पाण्यात भिजत अंत्यसंस्कार करावे लागत आहे.या ठिकाणी तीन सरण जाळ्या आहे त्या पैकी एकच जाळी सुस्थितीत आहे.दोन जाळ्याच्या खालच्या जाळ्या प्रत्येक वेळी काढुन ठेवलेल्या असतात.त्यामुळे काही वेळा दोन किंवा तीन अंत्यसंस्कार करतांना अडचण होते.या कडे वणी ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.या ठिकाणी अपुरी प्रकाश व्यवस्था असल्या कारणाने रात्रीच्या वेळी मोबाईल च्या लाईट मध्ये विधी उरकावा लागतो.स्मशानभूमीला असलेली नदीच्या बाजुची संरक्षण भिंत ही पडली असून धोकादायक झाली आहे.२५ ते ३०हजार लोकवस्तीचे गांव असुन स्मशानभूमीची झालेली दुरावस्था पाहुन दुसर्या गावातील लोक नावे ठेवत आहे.अनेक वेळा अनेकांच्या अंत्यसंस्कारा साठी सरपंच उपसरपंच किंवा सदस्य जातात त्यांच्या लक्षात ह्या बाबी येत नसाव्यात का ?या बाबत बघुन ना बघितल्याचे करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.स्मशानभूमी कडे जाणा-या रस्त्यांची ही दुरावस्था झाली आहे.रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार करण्यासाठी जातांना ही त्रास सहन करावा लागत असल्याने वणी शहरातील ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.या संदर्भात लोकनियुक्त सरपंच तसेच ग्रामविकास अधिकारी यांनी लक्ष घालून ग्रामस्थांना होत असलेला नाहक त्रासातुन मुक्त करावे अशी अपेक्षा वणी ग्रामस्थ करीत आहे.