मरळगोई सह परीसरात बीएसएनल नेटवर्कचा फज्जा
वेगवान नाशिक/अरुण थोरे
इतर नेटवर्कच्या तुलनेत स्वस्त असल्याने अनेकांनी आपले नंबर बीएसएनएल नेटवर्कमध्ये पोर्ट केले मात्र नेहमीच्या नेटवर्क समस्येने परिसरात बीएसएनएल मोबाईल धारक त्रस्त आहेत
मरळगोई येथे सध्या बीएसएनएलचे फोर जी नेटवर्क असून मात्र बॅटरी प्रॉब्लेम मुळे लाईट गेल्यास नेटवर्क गायब होत असुन, फोर जी नेटवर्कचा स्पीड खुपचं स्लो असुन, टुजी व थ्रीजी सेवाही गेल्या दहा ते बारा दिवसांपासून विस्कळीत झाली असुन कॉंलीग करतानाही कॉल डीस्कनेक्ट होत असल्याने, मोबाईल धारकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
परीसरातील पाचोरे, गोंदेगाव, देवगाव, भरवस खेडलेझुंगे आदी गावांत टुजी नेटवर्क गायब असल्याने कॉल डिस्कनेक्ट च्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याने बीएसएनएलची सेवा लवकरात लवकर सुरळीत करावी अशी मागणी नागरीकांडुन होत आहे.
अरुण थोरे गेल्या 3 वर्षापासून वेगवान मिडीया मध्ये काम करत असुन,पत्रकारितेची सुरुवात वेगवान सहमुहातुन झाली. सध्या वेगवान नाशिक मध्ये प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. निफाड तालुक्यातून शेती, राजकारण, क्राईम, विषयामध्ये चांगले ज्ञान असून शेतक-यांसाठी लेखन करण्याची आवड.