आता नाशिकमधूनचं इतर देशांमध्ये पण विमान उडणार, या तारखेला होणार सुरु सेवा
आता नाशिकमधूनचं इतर देशांमध्ये पण विमान उडणार, या तारखेला होणार सुरु सेवा Now travel services to other countries will start from Nashik
वेगवान नाशिक / साहेबराव ठाकरे
नाशिक, ता. 28 – नाशिकचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या तसेच लोकांना इतर देशांमध्ये जर प्रवास करायचा असेल तर ते मुंबई मध्ये जाऊन प्रवास करावा लागतो. मात्र यामुळ नाशिकरांसाठी ही आनंदाची बातमी म्हणता येईल. आपण किंवा आपले नातेवाईक यांना परदेशात येतांना किंवा परदेशात जाण्यासाठी दुसरे विमानतळ शोधण्याची गरज येणार नाही. यामुळे तुमची दगदग ही वाचणार आहे. Now travel services to other countries will start from Nashik
ओझर विमानतळावरून देशांतर्गत उड्डाणे सुरू झाली असून, आता येथून आंतरराष्ट्रीय उड्डाणेही सुरू होणार आहेत. पुढील महिन्यात सप्टेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार असल्याने नाशिककरांसाठी ही विमानसेवा फायदेशीर ठरणार आहे.
सध्या, ‘इंडिगो एअरलाइन्स’ नाशिकच्या ओझर विमानतळावरून नवी दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, इंदूर, गोवा आणि नागपूर येथे चालते. आंतरराष्ट्रीय सेवा सुरू झाल्याने नवीन देश नाशिकशी जोडले जातील.
तिकीट बुकिंगला सुरुवात झाली आहे नाशिकवासीयांना आता कमी वेळात सिंगापूर, बाली, श्रीलंका आणि थायलंड या लोकप्रिय पर्यटन स्थळांवर पोहोचता येणार आहे. नाशिकहून दररोज दुपारी 4.50 वाजता विमान सुटेल. तिकीट बुकिंग आधीच सुरू झाली असून, कंपनीने त्या पार्श्वभूमीवर वेळापत्रकही जाहीर केले आहे.
नव्याने जोडलेली गंतव्ये आणि फ्लाइट वेळा:
नाशिक – बाली: संध्याकाळी 4:50 ते रात्री 10:20
नाशिक – बँकॉक: दुपारी 4:50 ते रात्री 11:20
नाशिक – कोलंबो: दुपारी 4:50 ते दुपारी 12:55 पर्यंत
कोलंबो – नाशिक: सकाळी 7:30 ते दुपारी 4:20
नाशिक – सिंगापूर: दुपारी 4:50 ते पहाटे 4:30 पर्यंत
नाशिकची हवाई कनेक्टिव्हिटी वाढणार आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होण्याबरोबरच देशांतर्गत उड्डाणेही वाढणार आहेत. सप्टेंबरपासून जम्मू, श्रीनगर, चंदीगड, अमृतसर, वाराणसी आणि जयपूरसह अनेक ठिकाणी हवाई सेवा सुरू केली जाईल. इंडिगो एअरलाइन्स नाशिकहून देशभरातील अनेक प्रमुख शहरांसाठी विमानसेवा सुरू करत आहे. नाशिकची हवाई कनेक्टिव्हिटी जसजशी वाढत जाईल तसतसे शहरातील उद्योग, पर्यटन आणि इतर क्षेत्रांच्या वाढीला चालना मिळेल.
कनेक्टिंग फ्लाइटसाठी एक चांगला पर्याय बेंगळुरू फ्लाइट नाशिकला सिंगापूर, बाली, श्रीलंका आणि थायलंडसह अनेक नवीन देशांशी जोडेल. याशिवाय, कंपनीने नाशिकहून अबू धाबी, दुबई, हाँगकाँग, काठमांडू, लंडन, न्यूयॉर्क, पर्थ, पॅरिस, रोम, शारजाह, सिडनी, व्हिएन्ना आणि झुरिच या ठिकाणांसाठी ‘हॉपिंग फ्लाइट्स’द्वारे आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी प्रदान केली आहे.
प्रवाशांना जोडणाऱ्या ठिकाणी काही तास थांबावे लागले असले तरी, सध्या नाशिकवासीयांना या शहरांमध्ये जाण्यासाठी मुंबईला जावे लागते, ज्यासाठी सुमारे सहा ते आठ तास लागतात. यासाठी कनेक्टिंग फ्लाइट हा एक चांगला पर्याय ठरू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
पुढील महिन्याच्या 12 तारखेपासून ही सेवा सुरु होणार असल्याने आता तुम्हाला दुसरे विमानतळ शोधण्याची गरज नाही.