निराशा झालेल्या बळीराजा ला मांजरपाड्याची स्वप्नपूर्ती, भुजबळांच्या रुपाने या तालुक्यात दिवाळी
निराशा झालेल्या बळीराजा ला मांजरपाड्याची स्वप्नपूर्ती
वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव
येवला दिनांक 29ऑगस्ट /नाशिक अहमदनगर संभाजीनगर जिल्ह्याच्या हद्दीवरील येवला तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून सबंध महाराष्ट्राला परिचित तालुका.. अनेक गावात पिण्यासाठी बारमाही टँकर पाण्यासाठी महिलांची वणवण, दुष्काळी शेती, तालुका अंतर्गत आणि इतर तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्याअभावी विकासापासून कोसो दूर असलेला दुर्गम तालुका हीच येवल्याचीओळख.
कोण देणार जास्त पैसा, सोयाबीन की मका पहा कोण पडणार भारी Soybean corn price
….इतिहासासात येवला नाव अनेक संदर्भाने आदराने लिहिलं गेलं, तीच पुण्याई असेल म्हणून येवल्यासाठी २००४ ची विधानसभा निवडणूक सुवर्णक्षण घेऊन आली आणि भुजबळ आणि येवला या नात्याची सुरुवात झाली.
पैसाचं पैसा …या शेयर्सने केले 1 लाखाचे 24 लाख
जनतेने टाकलेल्या विश्वासाला ना छगनराव भुजबळ यांनी सार्थ ठरवत येवला लासलगाव मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलला मतदारांच्या स्वप्ना पलीकडचे कामे साकारली विकास कधी संपत नसतो. मात्र तरीही विकासाच्या दृष्टीने येवला परिपूर्ण झाला असे म्हणता येईल.
ऐश्वर्या राॅयने फारकत घेण्याच्या चर्चेमध्येच घरातील विषय मांडला,अभिषेत -ऐश्वर्या एकत्र राहत नाही
येवला तालुक्यातील उत्तरपूर्व भागात हरितक्रांती करणारा पुनेगाव दरसवाडी डोंगरगाव पोहच कालवाचे स्वप्न पूर्णत्वास गेला आहे व सत्यात उतरला आहे* . *कालव्याला पाणी येणार नाही हे केवळ राजकीय विरोधातून बोलले जात असले तरी या कालव्याला पाणी भुजबळ साहेबांनी आणून दाखवलं.
दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्याचे पाणी कोठे पोहचले..घ्या जाणून
सर्व सामान्य माणसाच्या मनात निर्माण केलेला विश्वास भूमिपुत्रांच्या नात्यापलिकडाचा आहे आणि हीच मतदारसंघातील भुजबळ साहेबांची खरी संपत्ती आहे. इतिहासाची पाने उचकत मागे वळून पाहिले की मग खऱ्या अर्थाने कळते ते उत्तरपूर्व भागाला बागायती करणाऱ्या कालव्याच्या दिवा स्वप्नाची कथा
पाण्याअभावी बरबाद झालेल्या पिढ्यानपिढ्या आणि आजही डोळ्यासमोर अंगावर शहारे आणणारे त्या पिढ्यांचे गरीब वारसदार हा कालवा म्हणजे पाणी उपलब्ध नसलेला आणि तरी शेतकऱ्यांना हरितक्रांतीचे स्वप्न दाखवणारा कदाचित हा एकमेव कालवा असावा. पूनेगाव धरणाचे पाणी दरसवाडी कालव्यात टाकून पुढे ते ८७ किमी डोंगरगाव पर्यंत येणार असा हा कालवा.
एक्टीवाला ट्क्कर देण्यासाठी TVS Motors ने काढली भन्नाट स्कुटर, किंमत आणि फीचर्स तर पहा
मात्र पुनेगाव चे पाण्याने दरसवाडी धरण सुद्धा भरू शकत नाही हे खरे वास्तव..तरीही सर्वच पक्षाचे नेतृत्व आमदारकी मिळवण्यासाठी विधानसभा निवडणुकीत या कालव्याला पाणी येणार आणि क्रांती होणार असे चित्र निर्माण केले जायचे .ज्या उमेदवाराला असे चित्र शेतकऱ्याच्या मनावर चांगले रंगवता आले तो आमदार व्हायचा हे अनेक निवडणुकात लोकांनी अनुभवले आहे.
आता गाईचे दुध काढण्यासाठी मशिन किंवा हातांची गरज नाही हे जुगाड पाहिले का (ViDEO )
खरे सांगायचे तर याला भुजबळ साहेब पण अपवाद नाही असेच म्हणावे लागेल.२००४ ला पहिल्यांदा ना छगनराव भुजबळ यांनी येवल्यातून उमेदवारी केली आणि स्थानिक लोकांच्या मागणीवरून प्रत्येक विधानसभा उमेदवार देतो त्याप्रमाणे पुणेगाव दरस वाडी चे पाणी डोंगरगावला आणतो असे सांगूनही टाकले .साहेब राज्याचे हेविनेट नेते आहेत साहेब पाणी आनतीलच हा विश्वासभोळ्याभाबड्या शेतकऱ्यांच्या माय माऊलीच्या ह्रुदयात धसला आणि भुजबळ आहे येवल्याचे आमदार झाले, राज्यात मंत्री झालेमतदारसंघात विकासपर्व सुरू झालेअनेक विकासकामे सुरू असताना शासनाच्या कागदावर आणि शेतकऱ्याच्या स्वप्नात असलेला कोरडा कालवा २००६ सालि प्रत्यक्ष शेतात दिसायला लागला.
कोण देणार जास्त पैसा, सोयाबीन की मका पहा कोण पडणार भारी Soybean corn price
शासनाच्या निधीतून कोरडा कालवा पूर्ण करण्याचे काम ना भुजबळ यांनी पूर्ण केले खरे मात्र पूनेगावं मधून पाणी येणे आणि ते दरसवाडी पार करून पुढे डोंगरगाव पोहचणे हे कधीच शक्य नाही हे वास्तव समोर आले .स्वप्नपूर्ती करणारा कालवा साकारला पण हरितक्रांती करण्याचे स्वप्न कोरडे राहिले
पण शब्दाला मागे फिरतील ते भुजबळ कसले मतदारसंघातील गोरगरीब लोकांना दाखवलेले स्वप्न मला पूर्ण करता येणार नाही अशी हार मानतील ते भुजबळ कसे असतील राज्यात हेविनेत नेते म्हणून ओळख असलेल्या भुजबळांनी २००८ सली सगळी शासकीय यंत्रणा कामाला लावत मतदारसंघात पाणी नेण्यासाठी मला पर्याय पाहिजे असा जणू अलिखित आदेशाच काढला.
या सगळ्या प्रयत्नातून समोर आला तो मांजरपाडा प्रकल्पस्वतः डोंगरदऱ्यात पायपीट करून प्रकल्प कसा असेल आणि गुजरात ल जाणारे पाणी कसे येवला तालुक्यात वळवता येईल हे पहिले ,समजून घेतले.
आणि नोंद नसलेले पाणी कागदावर आणले. २००८ साली इतिहासात पहिल्यांदा राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक नाशिक मध्ये घेण्याचे नियोजन भुजबळ यांनी केले. आणि याच बैठकीत मांजरपाडा प्रकल्पासाठी ५५० कोटी रुपये निधी मंजूर करून घेतला. २००९ ल विधानसभा झाल्या भुजबळ पुन्हा निवडून आले मंत्री झाले .पाहता पाहता पाच वर्षात मांजर पाडा बोगदा साडेआठ किलोमीटर पूर्ण झाला
अवघा दीड किलोमीटर बोगदा पूर्ण होऊन येवले करांचे स्वप्न पूर्ण होणार पण या स्वप्नाला २०१३ साली नजर लागली राज्यात सिंचन प्रकल्प घोटाळ्याचे आरोप झाले, शासनाने श्वेतपत्रिका काढायचे ठरवले. दुर्दैवाने श्वेतपत्रिका मध्ये मांजर पाडा प्रकलापाचा संबंध नसताना श्वेतपत्रिका मध्ये समवेश झाला आणि चौकशी होईपर्यंत काम बंद झाले. दरम्यान २०१४ ची विधानसभा आचारसंहिता सुरू झाली, निवडणूक झाली, भुजबळ पुन्हा आमदार झाले पण राज्यात सत्तांतर झाले.
सिंचन घोटाळा श्वतपत्रिकेतून मांजर पाडा प्रकल्प वगळावा यासाठी भुजबळ यांनी शासनाकडे प्रयत्न सुरू केले.दरम्यान दुर्दैवाने भुजबळ यांना राजकीय द्वेषातून इडी ने अटक केली आणि येवले करांच्या पदरी निराशा आली. तरीही मतदारसंघातील लोकांना दिलेल्या वचनाची जान ठेवत भुजबळ यांनी जेलमधून शासनाला पत्र लिहीत मांजर पाडा काम सुरू करा असे प्रयत्न सुरू ठेवले. दोन वर्षानंतर शासनाने मांजर पाडा प्रकल्प श्वेतपत्रिकेतून वगळला आणि २०१७ च्या सुरुवातीला राहिलेल्या दीड किमी बोगद्याच्या काम सुरू केले.
२०१८ मध्ये भुजबळ यांचा जामीन झाला, २०१९ च्या मार्च एप्रिल दरम्यान राहिलेल्या दीड किमी काम भुजबळ यांनी प्रयत्न करून पुर्ण करून घेतले जुलै २०१९ ला बिगद्यातून पहिल्यांदा पाणी पुणेगाव मध्ये आले. येवला तालुक्यातील हजारो लोकांच्या साक्षीने ना भुजबळ यांनी मांजर पाडा जलपूजन केले.
खऱ्या अर्थाने आता हरितक्रांतीचे सुरुवात होईल आणि दुष्काळी येवला बागायती होईल असा विश्वास घेऊन लोक घरी परतले २०१९ च्या पहिल्या प्रयत्नात पाणी ६३ किमी दरस वाडी त पोहचले, दरसवाडी मधून पाणी येवल्यात आले आणि बाळापूर पर्यंत पोहचले…
दरम्यान २०१९ विधानसभा निवडणुका झाल्या*. भुजबळ पुन्हा आमदार झाले. महविकास आघाडी सरकार स्थापन झाले आणि पुन्हा मंत्री झाले मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी उपलब्ध असताना पाणी डोंगर गाव पर्यंत पोहचले का नाही यावर भुजबळ यांचे काम सुरू झाले, प्रशासन कामाला लागले पूनेगाव १ ते २५ किमी कालवा ११० कूसेस चा होता , त्यास तत्काळ २२० कुसेश करण्यासाठी शासनाची मंजुरी घेऊन साडेसात कोटी निधी प्राप्त करून काम पूर्ण केले.
दरम्यान मात्र जगाला कोरोणा च्या संकटाने घेरले होते. सर्व कामे बंद पडली होती तरीही २०२०/२०२१ ल आहे त्या परिस्थितीत पाणी सोडले आणि पाणी पुन्हा बाळापूर पर्यंतच पोहचले. २००६ साली झालेला कालवा २०१९ पर्यंत पडीत असल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. कालव्याची दुरवस्था झालेली आहे. कालवा काँक्रीटीकरण हा एकमेव पर्याय आहे हे सर्वांना माहीत असेल तरी कोरोनाच्या संकटात शासन असताना, सगळी विकासकामे बंद केलेली असताना २५२ कोटी मंजूर होणार तरी कसे ?
तरीही भुजबळ थांबलेले नव्हते २०२१ च्या कोरोणा काळात अद्यावत यंत्रणेद्वारे संपूर्ण कालव्याचे सर्वेक्षण करून घेतले. याच काळात राज्यात राजकीय घडामोडी झाल्यात, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि पुन्हा भुजबळ साहेब विरोधात बसले. शासन विरोधात असल्याने पुन्हा या प्रकल्पाला अपेक्षित २४२ कोटी मिळणार नाही हे निश्चित झाले होते. मात्र येवले करांचे सुदैव पुन्हा राज्यात राजकीय घडामोडी घडल्या
भुजबळ साहेब यांनी मतदारसंघाच्या दृष्टीने योग्य निर्णय घेत सरकार मध्ये सामील झाले आणि अवघ्या काही महिन्यात* *२४२ कोटी या कालव्याची मंजूर झाले कामही सुरू झाले. पूणेगावं ते दरसवाडी या ६३ किमी विस्तारीकरण अस्तरिकरण साठी ९६ कोटी तर दरसवाडी ते डोंगरगाव या ८७ किमी कालवा विस्तारीकरण अस्तरीकरण, गेट,पुल या कामासाठी १४६ कोटी असे एकूण २४२ कोटी निधी मंजूर झालेल्या निधीतून होणाऱ्या कामामुळे येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कालव्यावर प्रत्येकी २० किमी अंतरावर काम सुरू झाले असून आधुनिक यांत्रिकी द्वारे काम केले जात आहे
पूनेगाव ते दरसवाडी या ९६ कोटी च्या कामात अस्तरीकरण, काँक्रीटीकण, पुल* , *कालव्याखालून जाणारे पाणी साठी HPD, नदीवरील पूल, कालव्याची गरजेनुसार संरक्षक भिंत, गेट, आदी कामांचा समावेश आहे दरसवाडी ते डोंगरगाव या ८७ किमी च्या कामात* *विस्तारीकरण,काँक्रीटीकरण सह कातरणी शिवारात ३ पुलबाळापुर ,सावखेडे, कुसमडी,नगरसुल,न्याहारखेडे, अंगुलगाव,तळवाडे या गावांच्या शिवारात मागणीप्रमाणे प्रत्येकी १ पुल, कुसुर ,हडपसावरगाव,वाईबोथी या गावांच्या शिवारात प्रत्येकी २ पुल, (एकूण मंजूर २२ पैकी १६ पुल येवला तालुका हद्दीत) वाईबोथी (७० किमी) व न्याहारखेडे (७५ किमी) येथील नदीवरील जा ये करण्यासाठीचे मोठे २ पुल , बंधारे भरण्यासाठीचे गेट व अनेक लहान कामे यात घेतले व आज ते पूर्ण पण झाले
आज रोजी या कालव्यावर प्रत्येकी २० किमी मध्ये वेगवेगळ्या यांत्रिकीने सर्वत्र सोबत काम सुरू आहे.
मा ना छगन भुजबळ पालकमंत्री असताना या कालव्यातील पाणी प्रवाहात होत असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी या कालव्याची पूर्ण १५० किमी कालवा समपातळी सर्वेक्षण करण्यात आले होते. त्याच सर्वेक्षणानुसार कालव्याचे समपातळी काम सुरू आहे . कालव्याचे काम योग्य दर्जाचे व्हावे त्याचप्रमाणे पावसाळा सुरू होण्याच्या आत काम पूर्ण होऊन पानी डोंगरगाव पर्यंत जाण्याचे उद्दिष्ट पूर्ण व्हावे यासाठी मंत्री छगन भुजबळ या कामाचा रोज आढावा घेत आहेत.
दरसवाडी ते डोंगरगाव या ८८ किमी मध्ये एकूण २४ किमी २०० मीटर कालवा लेव्हल काम पूर्ण झाले आहे तर संपूर्ण काँक्रीटीकरण काम पूर्ण झाले आहे
लेव्हल चे काम पूर्ण झाले आहे
२६ ते ३५ किमी मध्ये ३ किलोमीटर लेव्हल काम पूर्ण झाले आहे काँक्रीटीकरण काम पूर्ण झाले आहे या संपूर्ण कामाचा दैनंदिन आढावा स्वतः ना भुजबळ साहेब रोज घेत आहेत. अतिशय गतीने सुरू असलेल्या कामाची परिस्थिती पाहता निश्चितच कालवा लेव्हल करण्याचे काम मे अखेर तर काँक्रीटीकरण करण्याचे काम अखेर पूर्ण झाले आहे
..आमच्या पाचवीला पुजलेला दुष्काळ, बागायती स्वप्न पाहत दारिद्र्यात गेलेल्या आमच्या अनेक पिढ्या, वजनदार लोकप्रतनिधींअभावी झालेली आमची परवड हे सगळं नुकसान भुजबळ साहेबासारख्या वजनदार नेत्याकडून पूर्ण झाले आहे आणि पूर्वेकडून पश्चिमेला वाहून जाणारे पाणी मतदारसंघात उत्तरेकडून दक्षिणेकडे वळवणारे आधुनिक भगीरथ भुजबळ साहेब ठरले आहे हे कोणालाच नाकारता येणार नाही
एकनाथ रत्नाकर भालेराव पत्रकार वेगवान मराठी
मु पो सायगाव ता येवला जिल्हा नाशिक
मोबाईल 9665490690
वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये