दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्याचे पाणी कोठे पोहचले..घ्या जाणून
दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्याचे पाणी येवला मनमाड रस्ता क्रॉसिंगमधून नगरसुल डोंगरगावच्या दिशेने प्रवाहीत
वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव
येवला दिनांक.28ऑगस्ट /पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्याचे पाणी येवला मनमाड रस्ता क्रॉसिंग मधून नगरसुल डोंगरगावच्या दिशेने प्रवाहीत झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्या हस्ते गावकऱ्यांच्या उपस्थितीत मनमाड हायवे नजीक क्रॉसिंगवर जलपूजन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत कालव्यात उतरून आनंद उत्सव साजरा केला.
यावेळी विधानसभा अध्यक्ष वसंतराव पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, पाणी आंदोलक मोहन शेलार, गणपत कांदळकर मकरंद सोनवणे, अल्केश कासलीवाल, संतोष खैरनार, विजय जेजुरकर, अनिल दारुंटे, संजय पवार, दीपक गायकवाड, प्रीतम शहारे यांच्यासह ग्रामस्थ व पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
लाल कांद्याचे रोप विक्री आहे 📱राजेंद्र थेटे 9921200847 ( advt )
वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये