नाशिकः या तालुक्यात होणार छत्रपती शिवाजी महाराजांवर एवढ्या जेसीबीने फुलांची उधळण,मुख्यमंत्री उपस्थित
वेगवान नाशिक / मारुती जगधने
नांदगाव, ता. 26 आॅगस्ट 2024- नांदगांव दि २६ नांदगांव येथे दि ३० रोजी मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांचे वास्ते शिवसृष्टी छ.शिवाजी महाराज अश्वरुढ पुतळ्याचे लोकार्पण सोहळा दु. ३ वा. नांदगांव येथे होत आहे या कार्यक्रमाची जय्यत तयारी चालू आहे .
दि ३० रोजी नांदगांव मनमाड हायवेवर हनुमान टेकडी ते नांदगांव महाविद्यालय ना.शिंदे यांची १०० जेसीबीच्या मदतीने फुलांची उधळ,या दरम्यान मावळेग्रुप,ढोलताशा,पंजाबी ग्रुप,लेझीम,झेंडाटिपणी,चेंडाडान्स, कथकलीग्रुप या कार्यक्रमाचे आयोजन,नांदगांव येथील शिवसृष्टी प्रसंगी ना.गिरीष महाजन.ना.दादा भुसे,भाऊसाहेब चौधरी,खा.श्रिकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या वेळीअवधूत गुप्ते ,स्वप्निल बांदोडकर,वैशाली सामंत या कलावंताचे स्वरसंगित कार्यक्रम, या लोकार्पण होणार्या शिवसृष्टी तील द्रुष्ये छञपतीचा जन्म उत्सव. ,बाळ शिवबा राजे,छञपतींचा न्यायनिवाडा,शस्ञ शिक्षण,स्वराज्याची शपथ,संत तुकाराम महारांजाची भेट,पावनशिखड लढाई,सुरतेवर हल्ला,शाईस्तेखानाची लढाई ,अग्रासुटका,औरंगजेब भेट,दुर्गादास भेट,गडकिल्ले पहाणी,विर तानाजी,उंबरखिंड लढाई, शिव राज्यभिषेक,गोवळकोंडा भेट,पन्हाळगड,आदी भिंती चिञांची पहाणी या साठी शिवसेना आमदार सुहास कांदे व सौ अंजुमताई कांदे हे विशेष परिश्रम घेत असून दोन एकर जागेत उभारलेला शिवसृष्टीचा लोकापर्पण सोहळा जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली आहे .