महाराष्टातील मराठी न्यूज पेपर बंद होणार ?
वेगवान नाशिक
नाशिक,ता. 26 आॅगस्ट 2024- मराठी भाषेसाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले नाहीतर फार वाईट दिवस येतील मराठी वृत्तपत्र बंद होतील, मराठी शाळा वाचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. सध्या डिजीटल कडे लोकांचा कल वाढला असून त्यासाठी भविष्यातील परिस्थिती फार भयानक होत चालली आहे. घरातील प्रत्येक व्यक्ती डिजीटकडे वळतं आहे. असे प्रतिपादन जीएसटीचे माजी आयुक्त सुमेधजी काले यांनी केले.
ते कुसुमाग्रज मराठी विचार मंचच्यावतीने तयार करण्यात आलेल्या असे होते कुसुमाग्रज या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी बोलत होते.
भारतीय साहित्यक्षेत्रातील सर्वोच्च सन्मान, ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारताना व जागतिक मराठी परिषदेच्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना आदरणीय कुसुमाग्रजांनी माय मराठीची गाथा सांगता सांगता व्यथा व अवस्था यावर प्रकाशझोत टाकला.
इतर भाषांविषयी आदर बाळगताना मातृभाषेचा अभिमानाने स्वीकार केल्यास समाजमन अधिक सुदृढ, सृजनशील व कणखर होते, या विचारास त्यांनी अधोरेखीत केले. याच विचारांनी प्रेरीत होऊन मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी जनमानसात, कुसुमाग्रजांचे विचार रुजविण्यासाठी कुसुमाग्रज मराठी विचार मंच’ ची वाटचाल सुरू आहे.
संस्थेच्या उद्दीष्टांची, कार्याची कुसुमाग्रज तसेच सांस्कृतिक कार्य, सामाजिक कार्य, भाषाप्रेमी व साहित्य क्षेत्रातील प्रेमींना ओळख व्हावी, म्हणून स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता.
असे होते कुसुमाग्रज या पुस्तकावर आधारित परीक्षांचे आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे. आदिवासी भागातील लहान मुलांवर मराठी भाषेचे पाईक तयार करण्याचा प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून करण्यात येतो आहे.
या स्नेहमेळाव्यासाठी माजी जीएसटी आयुक्त सुमेधजी काले, दारुबंदी विभागाचे माजी संचालक गं.पा. माने, ज्येष्ठ साहित्यिक नरेशजी महाजन, जेष्ठ प्रकाशक वसंतराव खैरनार, अध्यक्ष सतीश बोरा, सरचिटणीस सुभाष सबनीस व्यासपीठावर उपस्थित होते. पुस्तकाच्या निर्मिती बाबत अलका कुलकर्णी आणि आरती डिंगोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश बोरा यांनी केले.सुत्रसंचालन डॉ अंजना भंडारी यांनी केले तर आभार नंदकिशोर ठोंबरे यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीततेसाठी दिलिप बारवकर, रामदास शिंदे, जयप्रकाश मुथा, उपेंद्र वैद्य, सुमती पवार, सुहासिनी वाघमारे यांनी प्रयत्न केले.