गोदावरीला तुफान पुर, रस्ते गेले पाण्याखाली
गोदावरीला तुफान पुर, रस्ते गेले पाण्याखाली godavari-storm-hits-roads-closed

वेगवान नाशिक
नाशिक, ता. 26 – नाशिक शहर तसेच जिल्ह्यात जोरदार संततधार पाऊस सुरु असल्यामुळे नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या आहे. नाशिक जिल्ह्यातील अनेक धरणे पण भरली असल्यामुळे त्याचा गोदावरी धरणातून विसर्ग करण्यात येत आहे .godavari-storm-hits-roads-closed
हे पण वाचा
नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी प्रवाहीत होणार नदी म्हणजे गोदावरी आता दुथडी भरुन वाहत असल्यामुळे रस्ते बद झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील गिरणा नदीलाही जोरदार पुर आल्यामुळे सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
नांदुरमध्यमेश्वर जवळ गोदावरील पुर आल्यामुळे या ठिकाणी रस्त्यावरील पुलाच्या वरुन पाणी वाहू लागल्यामुळे हा रस्ता बंद करण्यात आला असून या रस्त्याने जाणे घातकं ठरु शकते.
“महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे नाशिकमधील गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. पाण्याची पातळी वाढल्याने नाशिकमधील रामकुंडजवळील अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.
मुसळधार पावसामुळे नाशिकमधील अनेक मंदिरे पाण्याखाली रामकुंडाच्या काठावरील मंदिरे पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. गोदावरी नदीजवळ जाणे टाळावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.
रामकुंड जलमग्न नाशिक शहर आणि आसपासच्या जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. रविवारपासून गंगापूर धरणातून सुमारे साडेआठ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे रामकुंडावरील अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.
गावांना सतर्क राहण्याचा इशारा गंगापूर धरणासह विविध धरणांमधून पाणी सोडण्यात येत आहे. नाशिकच्या होळकर पुलाखालून सुमारे 13 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
