घरकुल लाभार्थ्यी रोहिले बुद्रुकला उपोषण करणार
वेगवान नाशिक / Wegwan NASHIK
नांदगाव, दिनांक, 26 ऑगस्ट 2024 सोमवार
नांदगाव तालुका प्रतिनिधी,(मुक्ताराम बागुल) :- नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक येथील लाभार्थ्यांना शासनाच्या रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीला घरकुल लाभार्थ्यांनी जागा मागणीसाठी 6 ऑगस्ट 2024 रोजी अर्ज दिला असून सरपंच, उपसरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी अद्याप पर्यंत जागा उपलब्ध करून दिली नसून मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक सिओ यांच्याकडे जागे संदर्भात प्रस्ताव पाठविला नसल्याने ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायतीच्या विरोधात दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी रोहिले बुद्रुक येथे आमरण उपोषणास लाभार्थी बसणार असल्याचे निवेदन नांदगाव पंचायत समितीकडे देण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रोहिले बुद्रुक येथील एकूण नऊ ते दहा लाभार्थ्यांना शासनाच्या रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले असून पैकी पाच लाभार्थ्यांनी रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत इकडे दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी दिलेल्या अर्जामध्ये म्हटले आहे की आम्ही आपल्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या जागेवर अनेक दिवसापासून अतिक्रमण करून राहत असलेल्या जागेवरच घरकुल बांधकामासाठी परवानगी द्यावी त्या संदर्भात मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक (सिओ) यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात येऊन आम्हाला घरकुल बांधकाम करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी असे अर्जामध्ये म्हटले होते.
परंतु ग्रामविकास अधिकारी, सरपंच यांनी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत ज्या लाभार्थ्यांनी अनेक दिवसापासून ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण करून रहात असलेल्या लाभार्थ्यांना त्याच जागेवर घरकुल बांधकामासाठी परवानगी देण्यात यावी असा ठराव मंजूर केला असून सदरचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक सिओ यांना पाठविण्यात यावा असा ठराव मंजूर करण्यात आला होता.
परंतु ग्रामविकास अधिकारी मगर यांनी ग्रामसभा बोलावून घरकुल लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देऊन त्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक शिव यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात येण्यासाठी विषय घेतला. या ग्रामसभेत जातीयवादी लोकांनी घरकुल बांधकामासाठी जागा देताना एका लाईनला जागा उपलब्ध करून द्यावी. शासनाने प्लॉट वाटप केलेल्या नकाशाप्रमाणे ज्या ठिकाणी प्लॉट वाटप क्रमांकानुसार केलेले आहेत त्या प्लॉट (भूखंड) पासून म्हणजे भूखंड क्रमांक 210 पासून ते पुढील भूखंड क्रमांकानुसार जागा देण्यात यावी असा ठराव केला.
मात्र ग्रामविकास अधिकारी मगर यांनी ज्या ठिकाणी बौद्ध समाजाच्या लोकांनी अतिक्रमण केलेले आहे त्याच ठिकाणी एका लाईनला घरकुल बांधकाम करण्यासाठी प्रस्ताव तयार करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे येथील लाभार्थ्यांनी आम्ही केलेल्या अतिक्रमण जागेवरच घरकुल बांधकामासाठी परवानगी द्यावी तसा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात यावा या मागणीसाठी गेल्या काही दिवस उपोषण करण्यात आले.
सदर उपोषणकर्त्याची मागणी मान्य करून त्या लाभार्थ्याच्या जागेवरच घरकुल बांधकामासाठी जागेसाठी प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्याकडे पाठविण्यात येईल परंतु याच ठिकाणी इतर घरकुल लाभार्थ्यांना जागा देण्यात येईल असा हट्टाहास धरला असल्याचे उपोषणकर्त्यांनी बोलताना सांगितले. म्हणजे आमच्या अतिक्रमण आजच काढण्याचा प्रकार ग्राम विकास अधिकारी करत असल्याचे सिद्ध होते. ज्या अतिक्रमणधारकाने घरकुल बांधकाम करण्यासाठी अडथळा आणला त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. याचाच अर्थ जातिवाद होत आहे की काय असा निघत असल्याचेही उपोषणकर्त्यांनी सांगितले.
उपोषणकर्त्याने दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी सोमवारी नांदगाव पंचायत समिती कडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तू ही रे बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत अनेक दिवसापासून जागेवर अतिक्रमण करून राहत असून त्याच अतिक्रमण जागेवर सरपंच, उपसरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्या तोंडी सांगितल्यावरून ग्रामपंचायतीच्या जागेवर घरकुल बांधकामास सुरुवात केली. परंतु ग्रामविकास अधिकारी यांनी सदरचे घरकुल बांधकाम करण्यासाठी बंद केले मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक सिओ यांची परवानगी अंड शिवाय बांधकाम करू नये असे तोंडी सांगितले.
आता ग्राम विकास अधिकारी यांनी दुसऱ्याच जागेचा प्रस्ताव करण्यासाठी पाठवीत असल्याचे समजते तरी आम्ही अतिक्रमण केलेल्या जागेवर घरकुलाचे बांधकाम सुरू केले आहे तरी आम्हाला आम्ही अतिक्रमण केलेल्या जागेवरच घरकुल बांधकामासाठी परवानगी मिळावी अन्यथा दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी रोहिले बुद्रुक येथे आमरण उपोषण करू यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास सर्वस्वी शासन व प्रशासन अधिकारी आणि पदाधिकारी जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी असे गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदगाव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सदर निवेदनाच्या प्रती मा. तहसीलदार साहेब तहसील कार्यालय नांदगाव, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक, मा. पोलीस निरीक्षक साहेब पोलीस ठाणे नांदगाव, मा. ग्रामविकास अधिकारी रोहिले बुद्रुक यांना निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आले आहेत. त्यावर ग्राम पंचायतीचे ग्रामविकास अधिकारी काय निर्णय घेतात याकडे घरकुल लाभार्थ्यांची लक्ष लागले असून संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.
मुक्ताराम बागुल हे वेगवान नाशिकचे नांदगाव तालुक्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते पत्रकार म्हणून सक्रिय आहे.