नाशिक ग्रामीण
गिरणा धरण एवढं भरल्यामुळे नागरीकाना सावधानतेचा इशारा
वेगवान नाशिक / मारुती जगधने
नांदगाव, ता. 26 आॅगस्ट 2024- नांदगांव तालुक्यातील तापीखोर्यातील गिरणा नदीवरील गिरणाधरण ७४% भरले असून नादीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशरा पांटबंधारे विभागाने दिला आहे .धरणात पाणी साठा वाढत आहे.
गिरणा प्रकल्प तालुका.नांदगाव जिल्हा. नाशिक नदीकाठच्या नागरिकांना आणि संबंधित शासकीय यंत्रणांना कळविण्यात येते की,
गिरणा प्रकल्प आज दि. 26/08/2024 रोजी सायंकाळी 6.00 पर्यंत 74% भरलेला आहे.
हे पण वाचाा
गिरणा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस चालू असून सध्यास्थितीत गिरणा प्रकल्पामध्ये सुमारे 35000 ते 40000 क्युसेक्स इतका विसर्ग येत आहे. तरी धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने गिरणा प्रकल्पातून कोणत्याही क्षणी नदीमध्ये पाणी विसर्ग सोडण्यात येईल.
तरी गिरणा नदीकाठच्या नागरीकांना आवाहन करण्यात येते की नदीप्रवाहात कोणीही जावू नये तसेच नदीकाठ लगतच्या आपली पशु-धन, चीजवस्तु, शेतीमोटार पंप सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे.
संबंधित शासकीय यंत्रणांनी याबाबत दक्षता घ्यावी असे धरण व्यवस्थापन व प्रशासकीय यंत्रणा यांच्या द्वारे आव्हान करण्यात येत आहे.
उपविभागीय अभियंता
पाटबंधारे उपविभाग, चाळीसगांव.यांनी कळविले आहे .