आणि अखेर पुणेगाव -दसरवाडी -डोंगरगाव भुजबळ पोहच कालवा खळखळू लागला ( Video )

वेगवान नाशिक / एकनाथ भालेराव
नाशिक, ता. 26 आॅगस्ट 2024- – यंदा मांजरपाडा प्रकल्प परिसरात व दिंडोरी या भागामध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे अनेक वर्षापासून पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव या कालव्यासाठी प्रचंड मेहनत घेणारे येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांच्या प्रयत्नाना अखेर यश आले आहे. अखेर पुणेगाव -दसरवाडी -डोंगरगाव भुजबळ पोहच कालवा खळखळू लागला.
तीन पिढ्यांची स्वप्नपूर्ती….. भुजबळ शब्दपूर्ती नजरेच्या अंतरावर असून ना छगनराव भुजबळ आदेशाने दरसवाडीतून येवला साठी पाणी सोडले आहे. आता प्रतीक्षा डोंगरगाव पर्यंत जाण्याची आहे.
पुणेगाव-दरसवाडी कालव्याचे पाणी या पावसाळ्यात डोंगरगावपर्यंत पोहोचावे यासाठी कालव्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
मागे काही दिवसापूर्वी मंत्री छगन भुजबळ यांनी दिंडोरी तालुक्यातील मावडी, खडकजामसह विविध ठिकाणी पुणेगाव-दरसवाडी कालव्याच्या सुरू असलेल्या कामाची व प्रकल्पस्थळांची पाहणी केली. यावेळी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अहमदनगरचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, नांदूरमध्यमेश्वर विभागाच्या कार्यकारी अभियंता संगीता जगताप, पुणेगाव कालव्याच्या उपविभागीय अभियंता योगिता घुगे यांची उपस्थिती होती.
पाहणीदरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी पुणेगाव-दरसवाडी कालव्याचे काम सध्या 12 किमी, 28 किमी, 35 किमी आणि 52 किमी अशा टप्प्याटप्प्याने सुरू असल्याचे नमूद केले. कालव्यांमधील संरचना आणि पुलांच्या बांधकामाला गती देण्यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले आहे.
गेल्या अनेक दिवसापासून पुणेगाव -दरसवाडी डोंगरगाव या कालव्याचा पाण्याची उत्सुकता अनेक लोकांनी होती. या कालव्यावर मोठ्या प्रमाणात टिकाही झाली होती. या कालव्याला गढुळ पाणी येणार नाही असे चांदवडच्या आमदाराने एका ठिकाणी म्हटले पण होते. मात्र येवल्यातील दमदार नेतृत्व छगन भुजबळ यांनी मात्र जोर लावून या कालव्याचे काम हाती घेऊन ते डोंगरगाव पर्यंत नेले, या कालव्यासाठी मांजरपाडा प्रकल्प तयार केला.
मांजरपाडा या प्रकल्पामुळे पुणेगाव -दरसवाडी -डोंगरगाव कालव्याला बळकटी आली. येणा-या पुढील काळामध्ये हा कालवा उन्ह्याळ कश्या पध्दतीने प्रवाहीत करत येईल साठी छगन भुजबळ निश्चित प्रयत्न करतील. म्हणून ते केंद्रसरकार व राज्यसरकार मध्ये शरद पवारांना सोडून फक्त येवल्यासाठी महायुतीमध्ये सहभागी झाले आहे हे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
View this post on Instagram
