नाशिक क्राईम

नाशिक मध्ये सर्वात लोभी लाचखोर

नाशिक मध्ये सर्वात लोभी लाचखोर


वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव

येवला दिनांक 25ऑगस्ट /राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ जानेवारी ते २० ऑगस्ट या कालावधीत ४८० गुन्हे दाखल केले. त्यापैकी सर्वाधिक १०० गुन्हे हे नाशिक परिक्षेत्रातील आहेत. विभागाने गेल्या वर्षी २० ऑगस्टपर्यंत ५४५ गुन्हे दाखल केले होते. त्यात यंदा ९१ गुन्ह्यांनी घट झाली आहे.

चप्पल घालून बाईक चालवल्यास कारवाई होणार? कायदा काय सांगतो

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

राज्यातील शासकीय यंत्रणांमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) कार्यरत असतो. हा विभाग नागरिकांनी केलेल्या तक्रारींची शहानिशा करून, सापळा रचून लाच मागणाऱ्या व घेणाऱ्यांवर कारवाई करते. तसेच बेहिशेबी मालमत्ता व अन्य भ्रष्टाचार करणाऱ्यांनाही कारवाईचा दणका दिला जातो.

एकच रेल्वेचे तिकीट काढा आणि 56 दिवस फिरा, पैशाची मोठी बचत ! रेल्वेची काफर योजना

त्यानुसार चालू वर्षात राज्यभरातील ७१२ लाचखोर जाळ्यात अडकून संबंधितांवर ४८० गुन्हे दाखल झाले. त्यापैकी लाच मागितल्याप्रकरणी ४५४, तर बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी २१ व अन्य भ्रष्टाचार प्रकरणी चार गुन्ह्यांचा समावेश आहे. त्यात सर्वाधिक १०० गुन्हे हे नाशिक परिक्षेत्रातील आहेत.

शेतक-यांचे कर्ज माफ होणार ! सरकारने घेतला निर्णय

(भ्रष्टाचार संपवण्यासाठी तक्रारदारांनी न घाबरता • विभागाकडे तक्रारी कराव्यात. लाचखोरांवर कारवाई करण्याबरोबरच तक्रारदाराचे प्रलंबित काम करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तत्पर असतो. आतापर्यंत ९९ टक्के तक्रारदारांची कामे पूर्ण मार्गी लावली आहेत. तेव्हा नागरिकांनी गैरप्रकारांना बळी न पडता थेट तक्रारी कराव्यात. – शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग)

BSNL ने काढली भन्नाट आॅफर, तुमच्या मोबाईलला वर्षभऱ रिचार्ज ची गरज नाही


एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!