मोठ्या बातम्या

महाराष्ट्रात हवामान तज्ज्ञांकडून पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा 


वेगवान नाशिक/ Wegwan Nashik  विशेष प्रतिनिधी,२५ ऑगस्ट :-

गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यातील विविध भागात पाऊस सुरु असताना अनेक ठिकाणी नद्या धरणे तुडुंब भरून वाहत आहे अशातच आज अरबी समुद्रात पसरलेल्या परिवर्तनीय घनतेच्या ढंगांचे पट्टे निर्माण झाले आहे. मुंबई, नागपूर कोकण, उत्तर व पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्हयांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

राज्यातील रायगड व पुणे येथे रेड अलर्ट प्रसारित करण्यात आला आहे. अद्ययावत उपग्रहाच्या निरीक्षणानुसार पुणे, सातारा आणि कोकणातील घाट परिसरात ७० ते १०० मिलीमीटर पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईत यलो अलर्ट असून गेल्या दोन तीन दिवसांपासून नाशिक, मुंबई,पुणे,जळगाव, मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे.

 

पुढील तीन दिवस या भागात पावसाचा जोर असाच राहण्याची शक्यता आहे. उत्तर कोकण भागात ६५ किमी वेग असलेले वारे वाहतील अशा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. तर विविध जिल्ह्यात ५० मिमी पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर व दक्षिण कोकणासह गोवा येथे सर्वत्र जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

 

दरम्यान सतत होत असलेल्या पावसाने राज्यातील प्रमुख नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत असून पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. पाण्याचा विसर्गात देखील वाढ करण्यात आली आहे.

 

पैठण येथील जयकवाडी धरणही ४० टक्के भरले आहे. नाशिकसह गंगापूर, दारणा,गौतमी,मुकणे व नांदुरमध्यमेश्वरसह नगर जिल्ह्यातील धरणे व बंधाऱ्यातून २९ हजारापेक्षा अधिक क्यूसेस पाण्याची आवकही जायकवाडी धरणात सुरु आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!