बोलठाण परिसरात रिमझिम पाऊस, शेतकरी पुरता समा..
बोलठाण परिसरात रिमझिम पाऊस, शेतकरी पुरता समा...
वेगवान नासिक / Wegwan NASHIK
नांदगाव, दिनांक 25 ऑगस्ट 2024, रविवार
नांदगाव तालुका प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :- नांदगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या घाट माथ्यावरील बोलठाण परिसरात तीन ते चार दिवसापासून रिमझिम पाऊस सुरू असून बोलठाण परिसरातील शेतकरीराजा होता समाधानी झाला आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील असलेल्या पिके रिमझिम पावसामुळे थोडाफार प्रमाणात का होईना आधार मिळून पिके सध्यातरी चांगले दिसत आहे.
सलग गेल्या तीन ते चार दिवसापासून बोलठाण परिसरात सुरू आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील मका, बाजरी, कपाशी, आधी पिके थोड्याफार प्रमाणात का होईना सध्या तरी चांगली दिसत आहेत. त्यामुळे या परिसरातील शेतकरी पुरता समाधानी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. परंतु नदी नाले यांना पाणी आलेले नाही त्यामुळे बोलठाण पासून जवळच असलेल्या खामगाव खारी लघु सिंचन तलाव अद्याप पर्यंत भरलेला नाही.
यामुळे बोलठाण परिसरात पिण्याच्या पाण्याची अजूनही टंचाई भासत आहे. त्यामुळे पाऊस चांगला नसल्याने नाराज असल्याचे चित्र दिसून येत आहे. इतरत्र बहुतेक ठिकाणी धरणे तलाव भरल्याच्या बातम्या व माहिती मिळत आहेत. परंतु या बोलठाण परिसरात चांगला पाऊस नसल्याने शेतकरी समाधानी झाल्याचे दिसत नाही.
मुक्ताराम बागुल हे वेगवान नाशिकचे नांदगाव तालुक्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते पत्रकार म्हणून सक्रिय आहे.