येवला तालुक्यात रुसून बसलेल्या पावसाची अखेर हजेरी
येवला तालुक्यात रुसून बसलेल्या पावसाची अखेर हजेरी
वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव
येवला दिनांक 24ऑगस्ट /येवला तालुक्यात अनेक महिन्यापासून रुसून बसलेल्या पावसाने हजेरी लावल्यामुळे खरिपातील मका, कपाशी, बाजरी आदी पिकांना तात्पुरते जीवदान मिळाले आहे.
पावसामुळे शेतकऱ्यांची निराशा काही अंशी कमी झाली. हवामान विभागाने यावर्षी चांगला पाऊस होईल, असा अंदाज दिला होता.
जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने पेरणीयोग्य सुरुवात केली. या पावसावर येवला तालुक्यातील भागातील
काही भागातील शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या; मात्र त्यानंतर पाऊस रुसल्याने शेतकरी हतबल झाला
त्यात जुलै महिन्यात रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने पिके दम धरून होते. परत पावसाने दडी मारल्याने पिके सुकू लागली होती. त्यात आता ऑगस्ट महिन्यात थोड्याफार जोरदार पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे; मात्र मुसळधार पावसअभावी नद्या, विहिरी,
बंधारे, नाले, अजूनही कोरडेठाक आहेत. येवला तालुक्यातील शेतकरी अद्यापही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये