Nashik या वीकेंडसाठी नवे डेस्टिनेशन शोधतायं ? मग येथे थांबेल तुमचा शोध
नैसर्गिक व धार्मिक पर्यटनाची सांगड असलेल्या या ठिकाणाला अवश्य भेट द्या
वेगवान नाशिक/ Wegwan Nashik- २४ ऑगस्ट, विशेष प्रतिनिधी:-
नाशिक: गेल्या काही दिवसांपासून पावसाने नाशिक जिल्ह्यावर चांगलीच कृपा केली आहे. त्यात पावसाळ्यात पर्यटनासाठी सोमेश्वर धबधबा, पांडवलेणी, पहिने , दुगारवाडी या व्यतिरिक्त एक दिवसासाठी एखादे नवे टुरिस्ट डेस्टिनेशन शोधताय का ? तर तुमचा हा शोध संपला.
शेतक-यांचे कर्ज माफ होणार ! सरकारने घेतला निर्णय
अहो अगदी नाशिकपासून अगदी १० किमी अंतरावर मातोरी व दारी गावाच्या मधोमध चक्क तीन डोंगराच्या आतमध्ये दऱ्याई माता देवस्थान आहे…काय देवी मंदिर… हो…हो…जरा थांबा नुसते मंदिरच नाही तर पावसाळ्यात निसर्ग बहरल्यानंतर डोंगरांमधून वाहणारा पाण्याचा धबधबा या परिसरात आपल्या घरातील सदस्यांसह जाण्यासाठी उत्सुक करतो एवढे निसर्गरम्य ठिकाण आहे.
तुम्हाला गाडीभर कर्ज मिळेल पण तुमचा CIBIL score चांगला पाहिजेत. काय असतो सिबील स्क्रोर
एक दिवसीय वर्षा-पर्यटनाचा खरा आनंद देणारे हे ठिकाण गेल्या काही दिवसांपासून नाशिककरांसाठी नवे टुरिस्ट डेस्टिनेशन बनले आहे. चला तर मग जाणून घेऊया या नव्या डेस्टिनेशनविषयी…!
महिलेच्या नावावर कर्ज,हप्ता असेल तर लाडक्या बहिणींचे पैसे वजा होणार की नाही पहा
नाशिकच्या वायव्येला असलेल्या मखमलाबाद गावापासून पश्चिमेला दोन किमी अंतरावर मातोरी गाव लागते याच गावाच्या उजव्या बाजूला वळण घेतल्यास ३ कि.मी. अंतरावर ‘दरी आई माता देवस्थान ‘ अशी एक कमान लागते. तेथून पुढे द्राक्षबागा अन शेताच्या कडेकडेने जाणाऱ्या रस्त्यावरून डोंगराकडे जाणारा एक रस्ता लागतो तेथून वर गेल्यास तब्बल २२६ हेक्टरमध्ये पांगलेल्या डोंगररांगा नजरेस भरतात.
याच डोंगररांगेमध्ये असलेल्या मंदिराकडे जाण्यासाठी शंभरएक पायऱ्या बनविण्यात आल्या आहे. येथूनच मंदिर नजरेस पडते. पुढे पायऱ्या संपताच स्टिलच्या पाईपची रेलिंग आहे. ती ओलांडताच एक मंदिर डोंगराच्या मधोमध दिसून येते. याच ठिकाणी माता सप्तशृंगीने एक दिवस मुक्काम केल्याची आख्यायिका प्रचलित आहे. चैत्रोत्सव व नवरात्रात या देवीची यात्रा भरत असते. धार्मिक पर्यटनासोबत निसर्गाचा मुक्त वरदहस्त लाभलेल्या या ठिकाणावर असलेल्या डोंगररांगा पावसाळ्यात हिरवाईचा शालू लेवून पर्यटकांना खुणावतात. त्यात मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या दोन डोंगराच्या घळीतून पावसाळ्यात डोंगरमाथ्यावर पडणारे पाण्याचा प्रवाहामुळे एक छोटा धबधबा प्रत्येकालाच आकर्षित करतो. येथून पडणाऱ्या पाण्यामुळे तयार होणाऱ्या धबधब्याजवळ पर्यटक तासनतास हरखून जातात. तेथून ते पाणी खाली प्रवाहित होताना पाण्याचा आवाज कानात साठवून ठेवावा असा ऐकू येतो. या ठिकाणाला पर्यटन स्थळाला राज्य शासनाचा ‘क ‘वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे.
महाराष्ट्राच्या सिमेवर चक्रीवादळ…आता काही खरं नाही
याशिवाय डोंगररांगांचा परिसर असल्याने त्यातील दहा हेक्टर जमीन वन विभागाला तीन वर्षासाठी वृक्ष लागवड करण्यासाठी देण्यात आली आहे. येथे सकाळी व सांयकाळच्या सुमारास मोर मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. याशिवाय दरी गावातील रहिवासी असलेले भारत पिंगळे यांसह अन्य ग्रामसेवक व शिवाजी धोंगडे, तुषार पिंगळे,भास्कर पिंगळे,मदन धोंडगे यांसह दरी, मातोरी,मखमलाबाद, पंचक्रोशीतील नागरिक येथे वेळोवेळी वृक्ष लागवड करत असतात. त्यामुळे येथील निसर्गसौंदर्यात अधिक भर पडत आहे. पावसाळ्यासोबत इतरहीवेळी येथील नैसर्गिक वातावरण व वनराईमुळे पर्यटक ये-जा करत असतात.
१) निसर्ग आणि माणूस हे समीकरण युगेयुगे जोडलेले आहे. त्यामुळे निसर्गाला लागून असलेल्या धार्मिक स्थळांना भेटी देण्याचा कलही वाढला आहे. यामुळे पर्यटन स्थळांना भेटी देतांना निसर्ग-पर्यावरण व धार्मिकतेची सांगड घातलेला दऱ्याआई माता डोंगर परिसर हा तमाम पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरेल यात शंका नाही. :- अभिजित टिळे, निसर्गप्रेमी.
२) या परिसरात असलेल्या डोंगररांगा,हिरवाई व दारी माता मंदिर यामुळे येथे धार्मिक व नैसर्गिक अशा दुहेरी पर्यटनाची सांग घालता येते. आपल्या स्वागतासाठी दरी आई माता देवस्थान व दरी आई वृक्षमित्र परिवार सदैव सज्ज आहे. येथे येतांना प्रेमी युगुले, नाच-धिंगाणा व मद्यपान करण्याच्या उद्देशाने येऊ नये. जेणेकरून या स्थळाचे पावित्र्य जोपासले जाईल. :- भारत पिंगळे,ग्रामपंचायत सदस्य, दरी.