चप्पल घालून बाईक चालवल्यास कारवाई होणार? कायदा काय सांगतो
चप्पल घालून बाईक चालवल्यास कारवाई होणार? कायदा काय सांगतो
वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव
येवला, ता. काही लोक चप्पल किंवा स्लीपर घालून बाइक चालवतात. अशा परिस्थितीत, चप्पल घालून कार किंवा बाईक चालवल्यास दंड होऊ शकतो, असं अनेकांचे मत आहे. पण हे खरं आहे का? याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे.
मोटार वाहन कायदा, 2019 मधील नवीन नियम
देशात बाईक अथवा कार चालवताना काही नियमांचे पालन करावे लागते. केंद्र सरकारद्वारे मोटर वाहन कायद्यात 2019 साली काही बदल करण्यात आले होते. त्या अंतर्गत अनेक नियम पाळावे लागतात.
बाईक चालवताना सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे बाईकस्वाराने आणि मागे बसलेल्या व्यक्तीने देखील डोक्यावर हेल्मेट घातलं पाहिजे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ते म्हणतात, “काही लोक चप्पल किंवा स्लीपर घालून बाइक चालवतात. अशा परिस्थितीत, चप्पल घालून कार किंवा बाईक चालवल्यास दंड होऊ शकतो.” म्हणजेच, काही लोक चप्पल किंवा स्लीपर घालून बाईक चालवितात, मात्र हे खूप धोकादायक ठरू शकते.
कायद्यातील काही नवीन कलमांनुसार, मोटारसायकल अथवा कार चालविताना वेशभूषा महत्वाची आहे. काही लोक चप्पल किंवा स्लीपर घालून बाईक चालवतात, मात्र हे खूप धोकादायक ठरू शकते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मतानुसार, चप्पल घालून बाईक चालवण्यावर कारवाई केली जाऊ शकते.
बूट किंवा सँडल का घालावेत?
खरंतर चप्पल घालून रस्त्यावर बाईक चालवणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे बाईक चालवताना चांगले बूट अथवा सँडल घालण्याचा प्रयत्न करावा. अपघात झाल्यास पाय सुरक्षित राहू शकतील. आणि दुखापत कमी होईल. चप्पल घालून दुखापत होण्याची शक्यता जास्त असते. तसेच गिअर चेंज करतानाही त्रास होऊ शकतो.
वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये