सरकारी माहिती

महिलेच्या नावावर कर्ज,हप्ता असेल तर लाडक्या बहिणींचे पैसे वजा होणार की नाही पहा

बँक खात्यावरील पैसे आता कोणत्याही कारणाने वजा होणार नाही


वेगवान नाशिक/Wegwan Nashik
२३ ऑगस्ट,  ( विशेष प्रतिनिधी ) राज्यभरात सध्या गाजत असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत संबंधित महिला व मुलींच्या खात्यावर जमा झालेले रक्कम हि कोणत्याही कारणाने बँकांना खात्यातून वजा करता येणार नाही.

 

याबाबत महिला व बालकल्याण विभागाकडून बँकांना ताशा सूचना पारित करण्यात आल्याचे महिला व बालकल्याणविभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

 गेल्या तीन महिन्यांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यभरात महिलांमध्ये प्रचंड उत्सुकता असून या योजनेत आजतागायत दोन कोटीपेक्षा अधिक महिलांनी अर्ज सादर केले आहे.

 

त्यात मागील महिन्याच्या अखेर पर्यंत पात्र महिलांच्या खात्यावर सरकारने प्रत्येकी १५०० रु. जमा केले. मात्र काही बँकांनी या महिलांच्या खात्यावरील रक्कम कमीत कमी रक्कम ठेव नसल्याने खात्यातून दंड म्हणून वजा केले.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

 

 राज्यभरात महिलांची हि अडचण लक्षात घेऊनमिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करू नये अशा सूचना सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत.

 

लाभार्थ्याचे कर्ज थकीत असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाही, कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्यांचे खाते गोठवण्यात आले असेल तर ते पूर्ववत करण्यात यावे असेही निर्देश बँकांना दिले आहेत.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!