अरे देवा ! छगन भुजबळांचा एवढा मोठा कालवा फुटला..

वेगवान नाशिक / एकनाथ भालेराव
येवला, ता. पुणेगाव धरण ओव्हरफ्लो होताच छगन भुजबळ तात्काळ पाणी दरसवाडी धरणात सोडण्याचे आदेश दिले आणि अवघ्या 3 दिवसात पाणी दरसवाडीत पोहोचले… 9 दिवसात दरसवाडी 65 % झाले असताना धरण भरेल आणि येवलासाठी पाणी सुटेल अशी तालुक्यातील जनतेला आतुरता लागली होती.
….. मात्र 20 तारखेला बहादुरी ता.चांदवड येथे ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि काही वेळातच कालव्याच्या वरून पाणी शेतात जाऊ लागले आणि बहादुरी येथे कालवा फुटला.
बहादुरी येथील शेतकर्यांनी शेतीचा मोबदला मिळाला आहे त्या पेक्षा आमचे जास्त क्षेत्र गेले आहे, त्याचा मोबदला मिळावा या कारणाने काँक्रिटीकरण कामात अडथळा आणून काम बंद पाडले नसते तर आज ही वेळ आली नसती असे येवला तालुक्यातील शेतकरी बोलत आहे.
कालवा फुटल्याचे वृत्त कळताच त्याच रात्री भुजबळ प्रशासनाला कामाला लावले….एक दिवसात प्रशासनाने काम पूर्ण केले मात्र काम पूर्ण झाल्यावर काम करणारे पोकलॅण्ड मशीन कालव्यात फसले.
पुन्हा कालव्यातील पाणी कालवा फोडून काढून द्यावे लागले. दुसरे पोकलॅण्ड आणून फसलेले मशीन काढले.पुन्हा कालवा दुरुस्ती काम केले..
आता कालवा दुरुस्ती काम आटोपले असून उद्या सकाळ पासून पुणेगाव चे पाणी दरसवाडी प्रवाहित होईल.. पाणी येवलासाठी येण्यास दोन दिवस उशीर होईल आणि पाणी येईलच….. परंतु पाणी आणण्यासाठी किती त्रास आहे, किती शेतकर्यांचा मोबदला मिळाला नाही म्हणुन विरोध आहे,
निधी साठी किती अडचणी आहेत. या अडचणींना फक्त मा ना छगनरावजी भुजबळ हेच मार्ग काढू शकतात. वयाच्या 78 व्या वर्षी राज्याच्या कामाच्या व्यापातून दर तास दोन तासाला कालव्याच्या कामाचा आढावा घेणारे नेतृत्व आमचे आमदार आहे. म्हणुन कधीही पूर्ण न होणारे आमचे पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याचे तीन पिढ्यांचे स्वप्नं पूर्ण होते आहे. भुजबळ साहेब आपल्यासारखा कामाप्रति प्रामाणिक असणारा लोकप्रतिनिधी होणे नाही.
मोहन शेलार
