नाशिक ग्रामीण

आज मनमाड बंदची हाक

शहरात सर्वत्र नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचा विषय


वेगवान नाशिक/Nashik/अविनाश पारखे, मनमाड,नांदगाव,दि.21 ऑगस्ट –

केंद्र सरकारने संसदेत अध्यादेश काढून तत्काळ अनु.जाती, अनु.जमातीच्या प्रवर्गातील प्रस्तावित जातींचे उप वर्गिकरण आणि क्रिमीलियरचा निर्णय रद्द करावा. त्याविषयी संसदेत कायदा पारीत करून अशा प्रकारचे उपवर्गीकरण आणि क्रिमीलियर कायदा लावण्यात येणार नाही याची हमी द्यावी, अनु.जाती,अनुसूचित जमातीचे आरक्षण नवव्या सुचिमध्ये समाविष्ट करावे,जातीनिहाय जनगणना करावी, कोलकाता येथील प्रशिक्षित डॉ.महिला बलात्कार व खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी तसेच नांदगाव तालुका अनु.जाती अनु.जमाती वरील वाढते अत्याचार आणि मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेकडील सर्व तपास काढून दुसऱ्या निःपक्षपाती प्रामाणिक अधिकाऱ्यांकडे वर्ग करावा, शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील शुभम (बच्चा) पगारे (वय 27) या युवकाची काही दिवसांपूर्वी झालेल्या निघृण हत्या गुन्ह्यातील तपास योग्य पध्दतीने होत नसल्याने सदर गुन्ह्याच्या तपासा करीता SIT स्थापन करावी  या आणि इतर मागण्यांकरिता आज मनमाड शहर बंद ची हाक देण्यात आली आहे.

मनमाड शहर हे धार्मिक,सामाजिक सलोख्यासाठी ओळखले जाते. विविध अपप्रवृत्तीच्या विरोधात,घटनांच्या विरोधात मनमाडकर नेहमीच उभे राहिलेले आहेत. आजच्या मनमाड बंद मध्ये सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. भारत बंद बरोबरच मनमाड बंद शांततेत पार पाडण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जात आहेत.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin


अविनाश पारखे

Shri.Avinash ParkheWorking with Wegwan Nashik since 2019..As a freelance reporter I always try to clear out the both sides. Always stand for what is right...what is truth...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!