नाशिक ग्रामीण

नांदगांव रेल्वेउड्डान पुलावर अपघात


वेगवान नाशिक / मारुती जगधने

नांदगाव, ता.   दि २१ मारुती जगधने नांदगांव ते ४० गांव नॅशनल हायवे नं एन ७५३जे वर ताडपञी वाहून घेऊन जानारा आयशर टेंपो पल्टी झाल्याची घटना दि.१९ऑगस्ट रोजी सकाळी घडली.

कांद्याच्या भावात मोठी उसळी, या वर्षातील सर्वात जास्त भावाची नोंद,कांदा गाठणार हा आकडा ( video )

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

नांदगांव ४० गांव नॅशनल हायवे वर विरूद्ध दिशेने येणाऱ्या ओमनीला वाचविण्याच्या प्रयत्नात गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने आयशर पल्टी झाला. या घटनेत जीवित हानी झाली नसुन वाहनांचे मोठे नुकसान झाले. वाहनाचा चालक व किनर माञ बचावले..

पहा .. या आमदारांने तालुक्यात केले पाणी च पाणी.. पावसाचा मात्र तपास नाही ..!

दि.१९ आॅगस्ट रोजी सकाळी ताडपञी घेऊन जानारा आयशर क्र. MH 23 AU 6141 हा आयशर अहमदाबादहुन नांदगांव मार्गे लातुरला जात असतांना नांदगांव नजीक उड्डाण पुलावर विरूद्ध दिसेने येणाऱ्या ओमनीला वाचविण्याच्या प्रयत्नात रोडच्या बाजूला सुरक्षा गार्ड तोडून पल्टी झाला..

या जिल्ह्यांना पुढील 24 तास महत्वाचे हवामान विभागाने दिला इशारा

दुपार नंतर क्रेनच्या मदतीने कंटेनर उभा करण्यात आला. दरम्यान आयशर मधले सर्व सामान दुसऱ्या गाडीत स्थलांतर करण्यात आले.
नांदगांव ते ४० गांव हायवेवर नांदगांव शहरातुन निघालेला उड्डाणपूल या ठिकाणी धोकेदायक वळनावर असल्याने रोडच्या कडेला कुठेही फलक लावण्यात आलेले नाही, तसेच या ठिकाणी वारंवार अपघात किंवा गाडी पल्टी होण्याच्या घटना घडत आहेत.

नाशिकचा उड्डाण पुल पाण्याखाली…व्हिडीओ पाहुन तुम्ही व्हाल थक्क

अपघाती वळण असल्याने वाहन धारकांची मार्गपास करतांना तारांबळ उडते.आणी अपघात होतो आज पर्यंत उड्डानपुल निर्मिती पासून सुमारे २५ वर्षात किमान ५० हुन अधिक लहान मोठे अपघात या ठिकाणी अवघड वळनार झालेले आहेत .

शेतक-याला हालकं समजू नका, या पिकातून कमविले कोट्यावधी रुपये, तुम्ही पण धनवान होणार

नांदगांव रेल्वेउड्डान पुलावर टी चौफुली आहे एक मार्ग साकोरा जातो दुसरा मार्ग ४० गांव जातो व तिसरा मार्ग नांदगांव कडे येतो अशा या अवघड एल मार्गावर नेहमीच अपघात होत असतात असे असताना या ठिकाणी गतीरोधक आहे .पण जानारे अवजड वाहन चढ असल्याने गितिने असतो समोरून येणारे वाहन उतार असल्याने भरधाव वेग असतो आणी या च वेळेला तिसर्या मार्गावरून वाहन असल्यास विविञ अपघात होतो.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!