मा.खा. गोडसे यांच्या सापत्निक वागणुकीला कंटाळून, शिवसेना शिंदे गटाला तालुका अध्यक्ष शरद शिंदे यांनी ठोकला राम राम…
छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या उपस्थितीत केला स्वराज्य संघनेत प्रवेश.. तालुका अध्यक्ष पदावर वर्णी
वेगवान / भाऊसाहेब र, हांडोरे
सिन्नर : दि. २० ऑगस्ट – राज्यातील विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार.. या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारने जोरदार तयारी सुरू केली आहे.. परंतु रूसवे फुगवे काही थांबेना..
सिन्नरचा राजकारणात पुन्हा दुसरा भुकंप. जिल्हा नेत्यांनी कुरघोडीचा परीणाम. .. मा.खासदार हेमंत गोडसे यांच्यासह जिल्हा स्तरावरील शिवसेना शिंदे गटाचे नेते यांच्या सापत्निक वागणुकीला कंटाळून मुख्यमंत्री शिंदे गट शिवसेना पक्षाला उदय सांगळे नंतर दुसरा धक्का.
प्रामाणिकपणे कामकरणारे तालुका अध्यक्ष शरद शिंदे पाटील यांनी नाईलाजाने केला शिवसेनेला रामराम.हेमंत गोडसे यांच्या विचित्र राजकारणाचा मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या पक्षाला बसतोय फटका.
हेमंत गोडसे व जिल्हा नेते शरद शिंदे पाटील व.पदाधिकारी यांना नेहमी डावलत.अगदी दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब येतात आणि सिन्नर शिवसेना पदाधिकारी यांना ठेवले जाते अंधारात।कठीण काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना सर्वात प्रथम शरद शिंदे पाटील यांनी साथ देत एकेक कार्यरता जमवून पक्ष वाढवला.परंतु हेमंत गोडसे वाजे गटाला जवळ करत तालुका अध्यक्ष शरद शिंदे पाटील व पदाधिकारी यांना छळत.
अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर अपार प्रेम असलेले सिन्नर शिवसेना तालुकाप्रमुख शरद शिंदे पाटील व पदाधिकारी यांनी हेमंत गोडसे व जिल्हा नेते यांच्या सापत्न वागणुकीला कंटाळून केला छत्रपती संभाजी राजे भोसले हस्ते स्वराज्य पक्षात प्रवेश. शरद शिंदे पाटील यांना देण्यात आली स्वराज्य पक्षाची सिन्नर तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी.
एकनाथ शिंदे यांना सोडचिट्टी देत ‘स्वराज्य’ पक्षाच्या सिन्नर तालुका प्रमुख पदी शरद शिंदे यांची नियुक्ती.
उदय सांगळे यांनी सुद्धा नाराज असल्याचे चित्र….
एकनाथ शिंदे यांना सोडचिट्टी देत ‘स्वराज्य’ पक्षाच्या सिन्नर तालुका प्रमुख पदी शरद शिंदे यांची नियुक्ती
जिल्हाप्रमुख डॅा.रुपेश नाठे यांचा हस्ते नियुक्तीपत्र प्रदान.
शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे तालुका प्रमुख शरद शिंदे यांचा स्वराज्य पक्षा मधे प्रवेश व तालुका प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत सिन्नर मतदारसंघावर विशेष लक्ष ठेवून असलेल्या ‘स्वराज्य’ची वाटचाल नवीन आणि जुन्या अशा शिलेदारांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे.
स्वराज्य पक्ष सिन्नर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात असणार असल्याने इतर पक्षातील प्रस्थापित नेत्यांना व कार्यकर्त्यांना याविषयी प्रचंड उत्सुकता आहे. स्वराज्य पक्ष जरतरच्या चर्चात न गुंतता प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांना न्याय देण्यासाठी नियुक्त्या जाहीर केल्याचे जिल्हाप्रमुख डॅा.रुपेश नाठे यांनी सांगीतले.आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ‘स्वराज्य’ने आपला दावा दाखल केला आहे.
स्वराज्यप्रमुख संभाजीराजे छत्रपती यांचे नाशिकवर विशेष प्रेम असून येत्या विधानसभे मधे नाशीक केंद्रस्थानी असनार आहे.स्वराज्याचे नाशिक मधील संपर्क कार्यालयात शरद शिंदे यांचा स्वराज्य पक्षा मधे प्रवेश करण्यात आला व सरचिटणीस धनंजय जाधव उत्तर महा.प्रमुख केशव गोसावी यांचा मार्गदर्शनात सिन्नर तालुका प्रमुख पदी जिल्हाप्रमुख डॅा.रुपेश नाठे यांनी नियुक्ती केली.
सिन्नर मधील शासकीय योजनांमध्ये असलेल अकार्यक्षम नियोजन बाबत आवाज उठवणे. महिलांसाठी सबलीकरणासाठी वेगवेगळी शिबिर लवकरच आयोजित करण्यात येनार असल्याचे यावेळी नवनिर्वाचीत ता.प्रमुख शरद शिंदे यांनी सांगीतले .तसेच स्वराज्याच्या पंचसूत्री ला प्राधान्याने न्याय देण्यासाठी सर्वच शिलेदार ताकदीने सज्ज आहेत.
यावेळी उपस्तीथ जिल्हाप्रमुख डॅा.रुपेश नाठे , नवनिर्वाचीत तालुका प्रमुख शरद शिंदे,सहसंघटक विजय चुंभळे , युवा ता.प्रमुख समाधान जाधव, शिवाजी गुंजाळ ता.संघटक,संदिप लोंढे शहराध्यक्ष शिवसेना, राजाराम आव्हाड, निलेश चव्हाण उपशहर प्रमुख,पुंडलिक बलक शहर संघटक,प्रविण कुलकर्णी सल्लागार.बाळा जाधव व पदाधीकारी.
छत्रपती संभाजी राजे यांनी विधानसभा निवडणुक लढवण्याची घोषना केल्यानंतर , समाजीक व राजकीय श्रेत्रातील कार्यकर्ते त्यांच्या नेत्रुत्वा मधे काम करण्याची इच्छा व्यक्त करताय.शिव-शाऊंच्या विचराच्या प्रत्यक व्यक्तीच स्वराज्य मधे स्वागत आहे.
~. डॉ . रूपेश नाठे . जिल्हा प्रमुख स्वराज्य पक्ष …..