नाशिक ग्रामीण

नाशिक जिल्ह्यात तुफान पाऊसःनद्यांना पूर,हाॅटेल मध्ये घुसले पाणी


वेगवान नाशिक/सागर मोर

वणी: शहर व परिसरात सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली.दोन दिवसा पासुन पाऊस पडत होता.परंतु दि.२० ऑगष्ट रोजी सकाळी ११.००वाजेच्या दरम्यान पावसाची जोरदार सुरवात झाली ओढे नाले नदी ओसंडून वाहु लागली.

 

देवनदीला पुर आला तसेच वणी सापुतारा महामार्गावर कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी जमा होऊन रस्त्यावर पाणी आल्याने काही काळ वाहतूक थप्प झाली होती.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

 

कालव्याला लागून असलेल्या शेतातील पिकांची काही प्रमाणात नासाडी झाली असुन बाजुला असलेल्या हाॅटेल मध्ये पाणी शिरले.देवतारा राईस मील व हाॅटेल गायत्री या परिसरात मोठ्याप्रमाणात ओढ्याला पुर आला होता.

 

पावसाळा सुरू झाल्यानंतर या हंगामात पहिल्याच जोरदार पाऊस पडला.संपूर्ण शहर स्वच्छ धुवून निघाले शहरात असलेला घाण कचरा ब-यापैकी वाहुन गेला.देवनदी दुथडी भरून वाहत होती.तिळेश्वर महादेव मंदिरात ही पाणी शिरले आहे.

 

दोन दिवस पासुन पाऊस पडत असल्याने नदीला पुर सुरू आहे.मंदिर नदी काठावर असल्याने निम्मे अर्धे मंदिर पाण्यात असल्याने भाविकांना पुजा विधी करता येत नाही.श्रावण महिना असल्याने मंदिरात येणा-या भाविकांची संख्या मोठी आहे.मंदिरात पाणी असल्याने सगळ्यांचा हिरमोड झाला आहे.

 

जोरदार पावसाने अनेक टोमॅटो लागवड झालेल्या शेतात पाणी साचल्याने काही प्रमाणात नुकसान होणार आहे.वणी शहरात आठवडे बाजार असल्याने मोठी वर्दळ असते पावसा मुळे बाजारात भाजी पाला विक्री करणारे व इतर दुकानदारांचे हाल झाले.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!