नाशिक ग्रामीण

देवळा तालुक्यात होणार अंगणवाडी मदतनीस भरती ; पहा कोणत्या गावांचा आहे समावेश


वेगवान नाशिक / बाबा पवार

 

देवळा : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प देवळा कार्यालयाअंतर्गत कार्यरत रिक्त असणा-या अंगणवाडी मदतनीस पदांची भरती प्रक्रिया होणार आहे. पात्र उमेदवारानी या पदासाठी अर्ज करावेत, असे आहवान देवळा प्रकल्पाचे बाल विकास प्रकल्प अधिकारी जयश्री नाईक यांनी केले आहे.

अंगणवाडी मदतनीस पदासाठीची किमान शैक्षणिक अर्हता बारावी उतीर्ण उमेदवार असावा. वय १८ वर्षे ते ३५ वर्षे दरम्यान असुन विधवा महिलांसाठी कमाल वयोमर्यादा ४० वर्षे राहणार आहे. उमेदवार हा त्याच महसुली गावाचा रहिवासी असावा. इच्छुक व पात्र गरजु महिला उमेदवारानी अर्ज २२ ऑगस्ट २०२४ ते ४ सप्टेबर मार्च २०२४ या दरम्यान कार्यालयीन दिवशी व वेळेत करावेत.

खालील दिलेल्या अंगणवाडी केंद्र निहाय ४ अंगणवाडी रिक्त पद असणा-या अंगणवाडी मदतनीस पदासाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. अर्जदार उमेदवारांनी अधिक माहितीसाठी संबधित ग्रामपंचायत कार्यालय अथवा प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधावा.

ग्रामपंचायतीचे नाव : सावकी – आदिवासी वस्ती व पवार वस्ती, सुभाष नगर आणि श्रीरामपूर येथे प्रत्येकी एक रिक्त जागा भरण्यात येणार असल्याची माहिती नाईक यांनी दिली.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin


बाबा पवार

गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, वेगवान न्यूज, कसमादे मीडिया, माय महानगर, नाशिक सिटी न्युज, जागर जनस्थान, इंडिया दर्पण, बी.टी.एल. न्यूज मराठी इत्यादी ठिकाणी पत्रकार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. मुख्यतः राजकारण, शेती, क्राईम, विषयातील बातम्यांमध्ये हातखंडा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!