मोठ्या बातम्या

सुट्टयांनंतर कांद्याचे भाव अजून तेजीत, आज एका ट्रॅक्टर होणार एवढे पैसे (व्हिडीओ पहा )

After the holiday, the onion market bounces, one tractor will make so much money


वेगवान नाशिक / राहुल देवरे 

उमराणे, ता. महाराष्‍ट्रामध्‍ये अंदाजे 1.00 लाख हेक्‍टरवर कांद्याची लागवड केली जाते. महाराष्‍ट्रामध्‍ये नाशिक, पुणे, सोलापूर, जळगांव, धुळे, अहमदनगर सातारा हेक्‍टरी जिल्‍ हेक्‍टरी कांदा पिकविण्‍याबाबत प्रसिध्‍द आहेत. तसेच मराठवाडा विदर्भ व कोकणात सुध्‍दा काही जिल्‍हयांमध्‍ये कांद्याची लागवड केली जाते. नाशिक जिल्‍हा हा महाराष्‍ट्रात नव्‍हे तर सबंध भारतात कांदा पिकविण्‍यात प्रसिध्‍द आहे. एकूण उत्‍पादनापैकी महाराट्रातील 37 टक्‍के तर भारतातील 10 टक्‍के कांद्याचे उत्‍पादन एकटया नाशिक जिल्‍हयात घेतले जाते.

 

कांद्याचे आगर म्हणून नाशिक जिल्ह्याचा पहिला क्रमांक लागत असला तरी आता नाशिक,पुणे,नगर, सह महाराष्ट्र तसेच देशाबरोबर इतर देशही कांदा पिक घेतात. मात्र नाशिकच्या कांद्याला जी चव आहे ते जगात कोणात्याच कांदा नाही. म्हणून सर्वांच्या नजर महाराष्ठ्रातील तसेच अशिया खंडातील सर्वात मोठी बाजार पेठे लासलगाव, पिंपळगाव बसवंत, उमराणे, चांदवड कडे लागून असते.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

 

नाशिक जिल्ह्यत मागील वर्षी प्रचंड दुष्काळ असल्यामुळे शेतक-यांचे पूर्ण हाल झाले. शेतकरी जेव्हा कांदा पिकवितो  तेंव्हा त्याला कांद्याला भाव राहत नाही अशी स्थिती नेहमी होते. कांद्याला जेंव्हा 200 रुपये भाव क्विंंटला मिळतो तेंव्हा मात्र शहरी लोकांच्या डोळ्यात पाणी येत नाही. शहरी लोकांनी हे समजून घेतलं पाहिजेत कांद्याचा भाव हा मोत्या पवळ्या सारखा असता…कधी वाढला तर वाढला नाहीतर सरसरी 1000 रुपये शेतक-यांना विकावा लागतो.

 

मागे शेतक-यांनी आपल्या शेतातील कांद्याचे पिक 1500 रुपये प्रमाणे विकून टाकले. मात्र वर्षभर सांभाळून जो कांदा ठेवला जातो त्यामध्ये निम्मी घट येते.  मग शेतक-यांच्या पदरात काय पडते हे सर्वांनी समजून घेतले पाहिजेत.

आज नाशिक जिल्ह्यातील उमराणे बाजार समिती मध्ये कांद्याला 3600 रुपये पर्यंत दर मिळाला तर पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये 3751 रुपये कांद्याला भाव मिळाला. सरासरी पिंपळगाव मध्ये 3500 रुपये भाव राहिला तर उमराणे मध्ये 3400 ते 3500 रुपये भाव शेतक-यांना मिळाला.

 

कांद्याचे प्रतवारी पाहुन कांद्याचे भाव ठरविले जातात. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या थोडाफार प्रमाणात कांदा शिल्लक आहे. यावेळी कांदा निर्यात बंदी करण्याची घोड चुक सरकार करणार असे दिसते. कारण महाराष्ट्राची विधानसभा तोंडावर असल्यामुळे मोदी सरकार कांद्याला चांगला भाव देण्यासाठी परवानगी देणार आहे.

 

त्यामुळे  येत्या काही दिवसांमद्ये कांदा 5000 हजारपर्यंत जाऊन ठेपणार यात शकाचं नाही. कारण काही दिवसापूर्वीच वेगवान नाशिकने  कांदा 4000 हजारापर्यंत जाणार असे वृत्त दिले होते. त्यानुसार कांदा 4000 हजाराच्या जवळ आला आहे.

आज 3700 रुपयाने एका ट्रक्टर मध्ये 30 क्विंंटल कांदा येतो. सरासरी 25 क्विंटल जरी म्हटले तर बळीराज्याला एका ट्रॅक्टरचे सध्या स्थितीमध्ये चांगले पैेसे होत आहे. असाचा कांद्याला भाव मिळत राहिल्यास महाराष्ट्र देशातील शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम बनणार आहे.

सरकारने फक्त कांद्याच्या भावामध्ये हस्तक्षेप न केल्यास शेतकरी तुमच्याकडे अनुदानही मागणार नाही.  कांदा हे व्‍यापारिदृष्‍टया सर्वात महत्‍वाचे भाजीपाला पिक आहे. भारतीयांच्‍या आहारात कांद्याचा वापर सर्रास केला जातो. कांदा पिकविणा-या राज्‍यात क्षेत्र व उत्‍पादनाच्‍या बाबतीत महाराष्‍ट्र अग्रस्‍थानी आहे.

महाराष्‍ट्रामध्‍ये अंदाजे 1.00 लाख हेक्‍टरवर कांद्याची लागवड केली जाते. महाराष्‍ट्रामध्‍ये नाशिक, पुणे, सोलापूर, जळगांव, धुळे, अहमदनगर सातारा हेक्‍टरी जिल्‍ हेक्‍टरी कांदा पिकविण्‍याबाबत प्रसिध्‍द आहेत. तसेच मराठवाडा विदर्भ व कोकणात सुध्‍दा काही जिल्‍हयांमध्‍ये कांद्याची लागवड केली जाते. नाशिक जिल्‍हा हा महाराष्‍ट्रात नव्‍हे तर सबंध भारतात कांदा पिकविण्‍यात प्रसिध्‍द आहे. एकूण उत्‍पादनापैकी महाराट्रातील 37 टक्‍के तर भारतातील 10 टक्‍के कांद्याचे उत्‍पादन एकटया नाशिक जिल्‍हयात घेतले जाते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!