वेगवान नासिक / Wegwan NASHIK
नांदगाव, दिनांक 20 ऑगस्ट 2024, मंगळवार
नांदगाव तालुका प्रतिनिधी – (मुक्ताराम बागुल)
:- नांदगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या बोलठाण पासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावरील रोहिले बुद्रुक घरकुल लाभार्थ्याचे भाऊ अनिल बागुल यांचे घरकुलाचे बांधकामासाठी जागा मिळावी या मागणीसाठी आज दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी मंगळवारपासून रोहिले बुद्रुक येथे दोन बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रोहिले बुद्रुक येथील पंचशीला किसन पठारे यांच्यासह चार ते पाच लाभार्थ्यांना रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले असून त्यांना ग्रामपंचायतीने अद्याप पर्यंत जागा उपलब्ध करून दिलेली नाही. सदरचे लाभार्थ्यांनी अनेक वर्षापासून रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतच्या हद्दीत असलेल्या जागेवर अतिक्रमण करून वास्तव्य करीत आहे. याच जागेवर त्यांना घरकुल बांधकाम करण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच ठकुबाई देविदास पवार,, उपसरपंच सुनंदा मुक्ताराम बागुल व ग्रामपंचायत सदस्यांनी सदरचे लाभार्थ्यांना त्यांनी केलेल्या ठिकाणी जागेवरच घरकुल बांधकामासाठी देण्यात यावी असा ठराव मंजूर केला असून तसा प्रस्ताव नाशिक जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात यावा असा ठराव मंजूर झाला आहे.
परंतु प्रस्ताव तयार करण्यासाठी ग्रामसभेची मंजुरी लागत असल्याने सरपंच ठकुबाई पवार व ग्रामसेवक मगर यांनी ग्रामसभा बोलविली असता त्या ग्रामसभेत कोरम पूर्ण झाला नसताने पुन्हा ग्रामपंचायतीने ग्रामसभा दोन दिवसानंतर लावली होती. या ग्रामसभेत जातीयवादी लोकांनी सदरच्या लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी जागा देऊन घरकुल बांधकामास परवानगी देण्यात यावा अशी मागणी लावून धरून गावातील सर्व अतिक्रमाने काढण्यात यावी असा अट्टहास धरला परंतु ग्रामपंचायतीकडे कोणत्याही प्रकारची लेखी उपलब्ध नाही.
याचा आधार घेत ग्रामपंचायतने घरकुल लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र घरकुल लाभार्थ्यांनी आम्ही राहत असलेल्या ठिकाणीच घरकुल बांधकामासाठी जागा देऊन परवानगी द्यावी अशी मागणी केली. कारण ग्रामपंचायत तिकडे 40 ते 50 भूखंड शिल्लक आहेत. परंतु प्रत्यक्षात प्रत्येक प्लॉटवर भूखंडावर येथील नागरिकांनी अतिक्रमण केलेली आहे. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना जागा देण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे.
त्यातच अतिक्रमण काढल्याशिवाय घरकुल वापरताना जागा देऊ नये असे देखील ग्रामसभेत तोंडी चर्चा करण्यात आली. अतिक्रमण काढेपर्यंत घरकुल लाभार्थ्यांना वंचित ठेवायचे का असा प्रश्न देखील येथील सरपंच उपसरपंच यांनी उपस्थित केला आहे.
रोहिले बुद्रुक येथे गेल्या दहा ते बारा वर्षांपासून पंचशीला किसन पठारे यांनी अतिक्रमण करून वास्तव्य केले आहे. तरी या ठिकाणी घरकुल बांधकामासाठी ग्रामपंचायतीने परवानगी द्यावी या मागणीसाठी अनिल केशव बागुल यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. आता ग्रामपंचायत काय निर्णय घेते याकडे गावासह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.
मुक्ताराम बागुल हे वेगवान नाशिकचे नांदगाव तालुक्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते पत्रकार म्हणून सक्रिय आहे.