नाशिकचा उड्डाण पुल पाण्याखाली…व्हिडीओ पाहुन तुम्ही व्हाल थक्क
वेगवान नाशिक / ऋषीकेश गांगुर्डे
नाशिक, ता. 19 आॅगस्ट – नाशिक शहर व जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली नाशिक जिल्ह्यासाठी हवामान विभागाने मोठं अलर्ट दिले आहे.
नाशिक जिल्ह्याला पाच दिवस अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस नाही अशी स्थिती नाशिकच्या पूर्व भागात होती. मात्र आज नाशिक जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळ शेतकरी आनंदी झाला आहे.
एवढं होत असलं तरी नाशिक जिल्हा तसेच महाराष्ट्र व देशाच्या दृष्टीने महत्वाचा असणा-या मुंबई- आग्रा हायवेवर करोडो रुपये खर्चुन उड्डाण पूल बांधण्यात आला आहे.
हा उड्डाण पूल बराच मोठ्या लांब पल्याचा असून तो बराच उंचही आहे. या उड्डाण पुलामध्ये नाशिक मधील वाहतूकीची कोंडी सुटली असली तरी पावसामध्ये हा उड्डाण पुल पाण्याखाली जात असल्याची हा बोलका व्हिडीओ आपल्याला पुरेसा आहे.
नाशिक मध्ये आज जो पाऊस झाल्या त्या पावसामध्ये आज हा एवढा मोठा उड्डाण पुल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता.
अनेक दुचाकीस्वारांना या पाण्यातून जाणे कठीण होत होते. आपण जमीनवर असेल आणि पुलावर पाणी साचले तर नवलं काहीचं नाही मात्र जर उड्डाण पूल असेल आणि उड्डाण पुलावर जर नदीचे स्वरुप येत असेल आणि आणि हा उड्डाण पुल जर पाण्याखाली जात असेल तर काय फायदा असा प्रश्न प्रवाशांना पडल्याशिवाय राहत नाही.
हा व्हिडीओ पहा आणि मग ठरवा.
View this post on Instagram