देवळालीतील समस्येंप्रश्नी आ.आहिरे यांची ब्रिगेडियर भारद्वाजांशी चर्चा

वेगवान नाशिक/Wegwan Nashik १९ ऑगस्ट,विशेष प्रतिनिधी –
देवळाली विधानसभा मतदार संघाच्या आमदार सरोज आहिरे यांनी देवळाली छावणी परिषद (कॅन्टोमेंट बोर्ड ) मधील विविध समस्या संदर्भात ब्रिगेडियर आशिष भारद्वाज यांची भेट घेत त्यावर चर्चा केली. तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या लवकरात लवकर दूर व्हाव्यात अशी मागणी आ. आहिरे यांनी केली.
सध्या स्थितीत नागरिकांना काही मूलभूत समस्या जाणवत आहे. त्या संदर्भात आ. आहिरे यांनी ब्रिगेडीयर यांची नुकतीच भेट घेऊन त्यांच्या दरबारीं सदर प्रश्न मांडले. यावेळी आ. आहिरे यांनी देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड येथील पाणी पुरवठा योजनंबरोबरच, सह्याद्री नगर रस्ता, बान्स स्कुल रस्ता, शिव रस्ते, महापालिका क्षेत्रातील प्रश्न वडनेर गेट ते नाका न 4 पर्यत रस्ता तसेच वालदेवी येथील निवृत्त अधिकारी वसाहत येथील पाणी प्रश्न अशा विविध मूलभूत सेवा विषयावर चर्चा केली. ब्रिगेडियर भारद्वाज यांनी आ. आहिरे यांचे म्हणणे ऐकून घेत, त्यांनी सांगितलेली कामे लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले. देवळाली छावणी परिषद मार्फत नागरिकांना रस्ते, पाणी, साफ सफाई (स्वच्छता) आदी सह विविध सुविधा पुरवल्या जातात. मात्र पाणी पुरवठा योजनेबरोबर काही दिवसापासून विविध ठिकाणी रस्ते होण्याबरोबरच भेडसावणारी कामे होणे आवश्यक आहे. त्यानुसार आ. आहिरे यांनी यामध्ये लक्ष घालून ते तात्काळ मार्गी लावण्यासाठी त्यांनी ही भेट घेतली.
