वेगवान नासिक / Wegwan NASHIK
नांदगाव, दिनांक 19 ऑगस्ट 2024, सोमवार
नांदगाव तालुका प्रतिनिधी – (मुक्ताराम बागुल) :– नांदगाव तालुक्याच्या घाट माथ्यावरील पूर्व भागात असलेल्या बोलठाण परिसरात आज दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी श्रावणी सोमवारी. सायंकाळी सहा वाजेनंतर पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या पिकांना समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी राजा सुखवला आहे.
नांदगाव तालुक्यातील ग्रामीण भागात बोलठाण, रोहिले बुद्रुक, जवळकी, जातेगाव , गोंडेगाव आदी परिसरासह बोलठाण परिसरात आज श्रावणी सोमवारी पाऊस झाल्याने त्याला धार्मिक श्रद्धेने श्रावणी सोमवारी पाऊस आल्याशिवाय राहत नाही असे या परिसरातील जुने जाणकार लोकांचे म्हणून मी आहे की श्रावणी सोमवार निमित्ताने पाऊस आल्याने शेतकरी राजा मनापासून देवाचे व निसर्गाची कृपा झाल्याचे म्हटल आहे.
बोलठाण परिसरात शेतकऱ्यांच्या शेतातील पिके सुकण्याच्या मार्गावर दिसून येत होते. त्यातच मक्याचे पीकास कणस येण्याच्या मार्गावर असून त्यात पाऊस झाल्याने शेतकरी राजा एकदम सुखावला आहे.
मुक्ताराम बागुल हे वेगवान नाशिकचे नांदगाव तालुक्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते पत्रकार म्हणून सक्रिय आहे.