येवला दुष्काळाच्या छायेत….पाऊसाचे थोडे दिवस शिल्लक
येवला दुष्काळाच्या छायेत....पाऊसाचे थोडे दिवस शिल्लक
वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव
येवला दिनांक 18ऑगस्ट,येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भाग कायम दुष्काळी समजला जातो पाऊस पडला तरच शेती बहरते. कपाशीत बी टी वाण आल्यापासून तालुक्यात कपाशीचे क्षेत्र व मका पीक मोठ्या प्रमाणावर वाढले इतर पिकाच्या तुलनेत बाजारभावाची खात्री वाटत असल्याने याकडे कल वाढला.
ढगांचा गडगडाट,वीजांचा कडकडाट, नाशिक जिल्हासह महाराष्ट्रात मेघगर्जेसह पाऊस
मागील वर्षी कापसाला चांगले दर मिळाल्याने यंदा ही मिळतील या आशेने शेतकऱ्यानी कपाशीची लागवड व मका पीक केली पण आता पावसाने तान दिल्याने वाढ खुंटली आहे.
विधानसभेला लाडक्या बहिणी भावाच्या डोक्यावर मिरे तर वाटनार नाही ना?
त्यात विविध रोगांनी हल्ला चढविल्याने शेतकऱ्यांना फवारणीचा मोठा खर्च करावा लागला पुढे रिमझिम पावसावर कपाशीच्या पिकाची व मका पिकाची जोमदार वाढ झाली.
पावसाने फलंदाजी केली सुरु, एवढा पाऊस …आता महाराष्ट्रात पाणीचं पाणी
आता मात्र आठ दिवसापासून उन्हाची त्रिवता वाढल्याने ऐन फळ लागन्याच्या अवस्टेत कपाशीला व मका पिकाला पाण्याची गरज भासु लागली आहे.
आता तुमची बस आली नव्या रुपात, तुमची 15 लाखाची कार फिकी पडणार
पावसाने दडी मारल्याने कपाशीचे व मका पिक करपु लागले आहे सुरवाती पासून पाऊस नसल्याने बंधारे विहारी नद्या कोरड़या असल्याने या पिकांना पानी देण्यासाठी कोणतीच शास्वत व्यवथा नसल्याने आता पावसाच्या भरोश्यावरच या भागातील शेतीचे भवितव्य अवलंबून आहे.
महाराष्ट सरकार शेतक-यांना मोफत वाटू लागले फवारणी पंप, तुम्हाला मिळाला का
कपाशी पिकास पाण्याचा जास्त ताण बसल्यास फळा बरोबरच पात्याची गळहि मोठ्या प्रमाणावर होते त्यामुळे मोठे नुकसान होते यामुळे पावसआभावि पांढरे सोने संकटात सापडले आहे शेतकर्यांत चिंता व्यक्त केली जात आहे
वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये