विधानसभेला लाडक्या बहिणी भावाच्या डोक्यावर मिरे तर वाटनार नाही ना?
विधानसभेला लाडक्या बहिनीनी भावाच्या डोक्यावर मिरे तर वाटनार नाही ना? Won't you feel it if your beloved sister hits her brother's head in the assembly?
वेगवान नाशिक / मारुती जगधने
नांदगाव, ता. 18 आॅगस्ट 2024-
सध्या राज्यशासनात लाडकी बहिन योजनेचा चांगलाचा बोलबाला सुरु असून बहिनींच्या बँक खात्यावर आता पैसे येऊ लागल्याने सर्व लाडक्या बहीनी, मावशी,ताई,माई,आक्का,दिदी सर्वच खुश आहेत विधानसभा जवळ आल्याने या योजनेला महत्व देण्यात आले खरे पण विधानसभा निवडनुकीत लाडक्या बहिनीने मुख्यमंञी,उपमुख्यमंञी, आमदार ,यांच्या डोक्यावर मिरे तर वाटणार नाही ना ? असा सवाला आनेक भावांनी केला आहे .
रक्षाबंधनानिमित्त भुसावळपर्यंत धावणार विशेष गाडी
राज्यातील प्रत्येक बहिन लाडक्या बहिन योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपञांची जुळवाजुळव करीत आहे तर काही बहिनींच्या खात्यावर पैसे पडल्याने त्या खुश आहे .तर दुसरीकडे विरोधकांनी विधानसभा निवडनुका डोळ्यासमोर ठेऊन या योजनेला मान्यता दिल्याची टीका होत आहे तसेच आता या योजने बरोबर लाडक्या बहिनीवर होणार्या अत्याचारावर देखील मुख्यमंञ्यानी लक्ष घालावे व बहिनीवर होणारे अत्याचार थांबवावे अशी मागणी होत आहे .
पावसाने फलंदाजी केली सुरु, एवढा पाऊस …आता महाराष्ट्रात पाणीचं पाणी
तालुक्यातील ५३ हजार महिलां- पैकी ३२ हजार ५०० महिलांचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज संगणकीय प्रणाली वरुन ऑनलाईन करण्यात आले होते. त्यापैकी जवळपास सहा हजार पाचशे महिलांचे बॅंक खात्याला आधार कार्ड जोडलेले नसल्याने त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी दिलेल्या बॅंकेच्या खात्याला आधार कार्ड केवायसी केलेली नसल्याने मिळाला नाही.तरी ज्या महिलांच्या बँक खात्यास केवायसी लवकरात लवकर करून घ्यावी जेने करुन सर्वांना वरील योजनेचा लाभ मिळेल असे आव्हान नांदगाव पंचायत समितीच्या महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती प्राची पवार यांनी केले आहे.
महाराष्ट सरकार शेतक-यांना मोफत वाटू लागले फवारणी पंप, तुम्हाला मिळाला का
याबाबत अधिक माहिती देताना श्रीमती पवार म्हणाल्या की, नांदगाव आणि मनमाड नगरपालिका क्षेत्रातील प्रत्येकी १२-१२ हजार व ग्रामीण भागातील २९ हजार महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेसाठी अर्ज दाखल केले. त्यापैकी दि.७ ऑगस्ट पर्यंत २६ हजार महिलांचे कागदपत्रे ऑनलाईन करण्यात आले. त्यात सहा हजार पाचशे महिलांचे बॅंकेत केवायसी नसल्याने त्यांना अद्याप तीन हजार रुपयांचा लाभ मिळाला नाही. तरी अशा सर्व लाभार्थी महिलांनी बॅंकेत जाऊन आपल्या खात्याला आधार कार्ड केवायसी करून घ्यावी जेने करुन सर्वांना वरील योजनेचा लाभ मिळेल.
तसेच उर्वरित तालुक्यातील २७ हजार महिलांनी ऑनलाईन अर्ज केलेले असून त्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज आणि कागदपत्रे ऑनलाईन करुन घ्यावी. व आपल्या बँक खात्याला आधार कार्ड जोडलेले नसेल तर बँकेत जाऊन बँक खाते पुस्तक झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स इत्यादी बँकेच्या नियमाप्रमाणे केवायसी करण्या- साठी लागणारे कागदपत्र जमा करून केवायसी लवकरात लवकर करून घ्यावी.जेने करुन त्यांना पुढील महिन्या- पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेचा लाभ मिळेल असे म्हटले.