” गंगांगीरी सप्ताहची आज सांगता : दहा लाख भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
खासदार - आमदार नीं घेतला पंक्तीत बसुन महाप्रसादाचा लाभ..
वेगवान नाशिक / भाऊसाहेब र, हांडोरे
सिन्नर : दिनांक १७ ऑगस्ट – सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह चे आज सांगता झाली असून जवळपास दहा लाख भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ , सुमारे बारा हजार स्वयंसेवकांनी अवघ्या सात मिनिटात बुंदी व चिवडा चे केली वाटप . यात श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रांचे २५ ००० सेवेकरी यात सहभागी झाले होते.. चारशे ट्रॅक्टर साह्याने महाप्रसादच वाटप करण्यात आले.. अनेक थोर मोठ्या भाविकांनी अगदी भक्तिभावाने आपला आनंद साजरा करून समाधान व्यक्त केले..
संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या सद्गुरू योगीराज गंगांगीरी महारांचा महाकुंभ सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी महाप्रसाद म्हणून अन्नदान ठेवले होते व या महाप्रसादाचा लाभ अनेक खासदार आमदार नीं घेतला पंक्तीत बसुन आस्वाद घेतला या पंक्तीत लोखो भाविक सहभागी झाले होते… पुढील वर्षी शहा गावाला या सप्ताहाचा मान मिळाला अशी मागणी नियोजन समितीचे अध्यक्ष संभाजी जाधव व समस्त गावकरी व ग्रामस्थांनी केली आहे.. यावर विचार केला जाईल असे आश्वासन महंत रामगिरी महाराज यांनी दिलं आहे..
नाशिक व शिर्डी चे खासदारांनी पंक्तीत बसुन घेतला महाप्रसाद .
नाशिक चे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांनी सर्वसामान्य लोकांमध्ये पंक्तीत बसून महाप्रसादाचा लाभ घेतला व आनंद व्यक्त केला , तसेच शिर्डी लोकसभा खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या सह अनेक आमदारांनी महाप्रसाद चा लाभ घेतला ….
*** *** *** *** ***
” सिमिंतिनी कोकाटे यांनी घेतला फुगडी चा आनंद …. !
तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या कन्या जिल्हा परिषद सदस्य सिमिंतिनी कोकाटे यांनी आज येथे विविध कार्यक्रमांत सहभागी होऊन भजन मंडळ यांच्या साथीने हातात टाळ घेऊन भजनाचा आनंद घेतला. तसेच महाप्रसाद दरम्यान पंक्तीत जाऊन स्वतः हातात बुदिंचे कॅरेट घेऊन भाविकांना वागण्याचं कामं करून आपली सेवा रुजू केली यावेळी आई सौ.सिमाताई माणिकराव कोकाटे यांनी ह्या सर्व कार्यक्रमाचा जवळुन आनंद घेतला…
या सप्ताह दरम्यान मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सह मराठा नेते श्री मनोज जरांगे व अनेक मान्यवर नेत्यांनी आपली उपस्थिती लावली..
सप्ताह कार्यक्रम ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित करतांना सांगितले की. ” हा देश.राष्ट .साधु संत महंत यांच्या आशीर्वादाने बहरलेला असतो. त्याचं असणं गरजेचं असतं. त्यांच्या जोरावर हे राज्य चालत असताना कोणी तरी ह्या महान संत श्री रामगिरी महाराज यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असले हे दुर्दैव आहे.. महाराजांच्या केसालाही धक्का बसणार नाही, यांची काळजी आपल्या सह राज्य सरकारची आहे आणि ती आम्ही घेऊ. यासारख्या महान सप्ताहाचे आयोजन करून समाजात शांतता आणि समृद्धी प्रदान करण्यात मदत होते.. अशा कार्यक्रमांना मी आवर्जून उपस्थित राहण्याचे प्रयत्न करत असतो.. असे हि श्री शिंदे यांनी या वेळी सांगितले.
सात दिवसांपासून सुरू असलेल्या या अखंड महायज्ञ . महाकुंभह सप्ताह चे आज सांगता झाली असून या सोहळ्याला आमदार माणिकराव कोकाटे. सिमिंतिनी कोकाटे. राजेश गडाख. संभाजी जाधव. कैलाश थोरात यांनी विशेष परिश्रम घेतले असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहा. विघनवाडी. कारवाडी. पंचाळे. देवपूर.मिठसागरे. शिंदेवाडी पांगरी आदी गावातील सर्व लोकांनी मोठ्या भक्तिभावाने खूप मेहनत सप्ताह कमिटीला सहकार्य केले..
!