अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी एकास मनमाड येथे अटक
मनमाड शहर पोलिसांची कामगिरी
वेगवान नाशिक/Nashik/अविनाश पारखे, मनमाड,नांदगाव,दि.18 ऑगस्ट-
नाशिक जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्र वापरून गुन्हे घडले असल्याने त्यावर प्रतिबंध व्हावा याकरीता अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश श्री. विक्रम देशमाने,पोलीस अधीक्षक यांनी दिले होते.
पोलीस निरीक्षक श्री.विजय करे यांना मनमाड शहरात एक इसम अवैध अग्निशस्त्र घेवून येणार असल्याची गुप्त बातमी मिळाली होती.गुप्त बातमीच्या आधारे मनमाड शहर पोलीस ठाणे कडील गुन्हे शोध पथकातील अंमलदार पो.ना. गणेश नरोटे,पो.ना.पंकज देवकाते,पो.कॉ.संदीप झाल्टे,पो.कॉ.रणजित चव्हाण,पो.कॉ.राजेंद्र खैरनार अशांनी सापळा रचून अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसम करण महेंद्र साळवे,वय 26,रा.घोडके नगर, ग्रामपंचायत गार्डनजवळ,पिंपळगाव ब., ता.निफाड जि.नाशिक यास ताब्यात घेवून त्याचेकडून एक गावठी बनावटीचे अग्निशस्त्र जप्त करण्यात आले आहे.
अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमाविरूध्द मनमाड शहर पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 अन्वये गुन्ह्याची नोंद करून अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई श्री.विक्रम देशमाने,पोलीस अधीक्षक,श्री.अनिकेत भारती,अप्पर पोलीस अधीक्षक व श्री.सुरज गुंजाळ,उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली मनमाड शहर पोलीस ठाणे कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.
पोलीस निरीक्षक श्री.विजय करे यांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या किंवा विक्री करणाऱ्या व्यक्तींबद्दलची गोपनीय माहिती व्यक्तीशः भेटून द्यावी.गोपनीय माहिती देणाऱ्या इसमाची ओळख उघड केली जाणार नाही असे आवाहन केले आहे.
Shri.Avinash Parkhe
Working with Wegwan Nashik since 2019..As a freelance reporter I always try to clear out the both sides. Always stand for what is right…what is truth…